कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जोराचा पाऊस होत आहे. आठ ते दहा दिवस महापूर येतो. कोल्हापूर शहरावर त्याचे संकट येते. महापूर आला की, कोल्हापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नेहमीप्रमाणे आठ ते दहा दिवस बंद राहतो. त्याचे कारण महापुरात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे शहरातील तीन उपसा केंद्रांची सुधारणा व अद्ययावत करण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला आहे; परंतु प्रशासनाने निधी नाही, असे कारण सांगून हा गंभीर प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. तेव्हा आपण या केंद्रासाठी आवश्यक निधी तातडीने द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
फोटो क्रमांक - ३००७२०२१-कोल-शिवसेना निवेदन
ओळ - कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या उपसा केंद्राच्या सुधारणेसाठी तसेच अद्ययावत करण्यासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.