शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ, ताकारीला एआयबीपीतून निधी

By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST

संजयकाका पाटील : सांगली-कोल्हापूर रस्त्याला टोल लागणार नाही

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ व ताकारी सिंचन योजनेला वेगवर्धित सिंचन योजनेतून (एआयबीपी) निधी मिळणार असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम दर्जाहिन झाले असल्याने या रस्त्याला टोल लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. पाटील म्हणाले की, केंद्र शासनाने एआयबीपी योजना बंद केलेली नाही. या योजनेतून म्हैसाळ व ताकारी योजनेच्या निधीचा प्रस्ताव दिला होता. त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. टेंभू योजनेचे पाणी नागज (ता. कवठेमहांकाळ) ओढ्यात सोडले जाणार आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत पाणी ओढ्यात येईल. त्यामुळे नागज परिसरातील १७ गावांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली - कोल्हापूर रस्त्याच्या टोलबाबत पाटील म्हणाले की, या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांवर टोलचे भूत बसणार नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत योग्यवेळी निर्णय होईल. गेल्या वर्षभरात शासकीय निधी व खासदार विकास निधीतून जिल्ह्यात कोट्यवधीची कामे मंजूर झाली आहेत. बेदाणा, हळद, गूळ, मिरचीवरील व्हॅट रद्द करण्यात यश आले. मालेगाव-मनमाड-दौंड हा मार्ग मिरजेतून बेळगावला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रियेची काम सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्ग मिरजेतून जाणार आहे. त्यासाठी मिरजेत उड्डाणपुलाचा प्रस्ताव दिला आहे. पर्यटन विभागातून शुकाचार्य, औदुंबर, सागरेश्वर, हरिपूर, महांकाली देवस्थानसाठी ३ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद घोटाळ्याची चौकशीजिल्हा परिषदेच्या विविध विभागात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या घोटाळ्यातील दोषींची चौकशी होऊन कारवाई होणार आहे, असे सांगत जिल्हा परिषदेला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरच नियुक्त केला जाईल. विधिमंडळ अधिवेशनानंतर सीईओ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.