शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे

By admin | Updated: October 23, 2016 00:35 IST

संजय कोले : साखरेचे पैसे शेतकऱ्यांना, उपपदार्थांत कारखान्याचा खर्च भागवा

सांगली : काही संघटनांनी उसाच्या एफआरपीचे (रास्त आणि किफायतशीर किंमत) तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. ही चूक या हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी द्यावी. जे कारखाने एफआरपी एकरकमी देणार नाहीत, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. एफआरपी दिल्यानंतर उर्वरित दुसरा हप्ता कारखान्याने उपपदार्थांची विक्री केल्यानंतर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.ते म्हणाले की, मागील हंगामामध्ये साखरेचे दर कमी झाले होते. यामुळे एफआरपी दोन टप्प्यामध्ये घेतली होती. सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल ३३०० ते ३५०० रुपये आहेत. भविष्यातही हा दर नियमित राहण्याची शक्यता आहे. यामुळे या हंगामामध्ये एफआरपीचे तुकडे कदापी पाडू देणार नाही. कायद्यानुसारच एफआरपीची रक्कम एकरकमी मिळाली पाहिजे. डॉ. सी. रंगराजन समितीनेही शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी देण्याची सूचना केली आहे. या प्रश्नावर आम्ही आंदोलन करणार आहोत. ते म्हणाले की, साखरेचे सध्याचे दर आणि जिल्ह्यातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यानुसार उसाला २२०० ते २८०० रुपये एफआरपी होणार आहे. एफआरपी दिल्यानंतर उर्वरित रक्कम उपपदार्थांची विक्री झाल्यानंतर द्यावी. कारखान्यांना हे अवघड वाटत असेल, तर गुजरातमधील कारखान्यांच्या धर्तीवर साखरेचे सर्व पैसे शेतकऱ्यांना देऊन उपपदार्थांवर कारखान्यांनी त्यांचा खर्च भागवावा.एक टनाचे गणितएक टन उसापासून सरासरी १२० किलो साखर तयार होते. १२० किलो साखरेला ३५ रुपये किलो दर मिळाल्यास ४२०० रुपये रक्कम कारखान्यांकडे येते. तोडणी आणि वाहतूक, अबकारी कर, शासनाचा अधिभार हा सर्व खर्च १४०० रुपये येतो. सर्व खर्च वजा जाता उसाला प्रतिटन २८०० रुपये दर देण्यात काहीच अडचण नाही. याशिवाय, वीज, बगॅस, मोलॅसीस आदी उपपदार्थांपासून प्रतिटन उसापासून किमान ५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षीच्या हंगामामध्ये प्रतिटन ३२०० रुपये अंतिम दर मिळाला पाहिजे, अशी मागणी संजय कोले यांनी केली.