शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी, दुष्काळावरून राजू शेट्टींचे आंदोलनास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:47 IST

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील आभार दौरे आटोपल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उपसण्याची तयारी केली ...

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील आभार दौरे आटोपल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उपसण्याची तयारी केली आहे. येत्या सोमवारी (दि. ६ मे) थकीत एफआरपीवरून साखर आयुक्तांना, तर दुष्काळावरून विभागीय आयुक्तांना जाब विचारला जाणार आहे. त्यानंतर बुधवार (दि. ८ मे) पासून प्रचारासाठी उत्तर भारतातील राज्यामध्ये उतरणार आहेत. विशेष म्हणजे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार सभा घेण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार झाले आहेत. आता तिसऱ्यांदा संसदेत जाण्यासाठी ते नुकतेच मतदानाला सामोरे गेले आहेत. मतदान झाल्याच्या दुसºया दिवसापासून (२४ एप्रिल) त्यांनी मतदारसंघातून आभार दौरे सुरू केले आहेत. मतदारसंघांतर्गत येणारे शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, वाळवा, शिराळा, शाहूवाडी, आष्टा, इस्लामपूर या तालुक्यांचे दौरे आज पूर्ण झाले. हे दौरे पूर्ण करून त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे.थकीत एफआरपीच्या बाबतीत निवडणुकीआधी ‘स्वाभिमानी’ने आंदोलन केले होते, त्यावेळी ८0 टक्के तरी रक्कम पदरात पाडून घेतली होती. आता उरलेली एफआरपी का दिली नाही, कारखान्यांवर का कारवाई नाही, साखर जप्तीच्या बाबतीत काय झाले, यासंदर्भात सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना जाब विचारला जाणार आहे. कारवाईचे पत्र घेऊनच कार्यालयातून बाहेर पडणार आहे.एफआरपीबरोबरच दुष्काळाचा विषय अग्रक्रमाने घेतला जाणार आहे. सध्या दुष्काळाने निम्म्याहून अधिक महाराष्ट्र होरपळत आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचे कारण सांगून सरकारने व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता निवडणुका विसरा आणि दुष्काळात होरपळणाºया जिवांना दिलासा द्या या मागणीसाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना सोमवारीच जाब विचारला जाणार आहे. ठोस उपाययोजना न केल्यास रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचा इशाराही दिला जाणार आहे.उत्तर भारतात प्रचार करणारहातकणंगलेतून निवडणूक लढवलेल्या शेट्टी यांच्या प्रचारासाठी योगेंद्र यादवासह देशभरातील शेतकरी नेते आले. आता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यांत स्वत: शेट्टी उत्तर भारतात प्रचारासाठी जाणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेशात सभांचे नियोजन आहे.भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारमी हातकणंगलेतून एक हजार एक टक्के विजयी होणार आहे. माझा लोकांवर आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. भाजपने मात्र खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरोधात प्रचार केला, आरोप केले, आता पुढील पाच वर्षे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देत राहणार आहे.