चालू गळीत हंगामात शरद सहकारी साखर कारखान्याकडे गळितास आलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे होणारी प्रतिटन २८२९ रुपये रक्कम एकरकमी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली,
सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या या कारखान्याकडून कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची परंपरा आजही कायम राखली आहे. यावर्षी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस शरद साखर कारखान्याकडे गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
फोटो-राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा फोटो वापरावा.