शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्ष निवडीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: December 22, 2016 23:50 IST

जयसिंगपूर नगरपालिका : शाहू आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळणार की, जुन्या जाणत्या सदस्याची निवड करणार याची उत्सुकता

जयसिंगपूर : नगरसेवकांतून उपनगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाल्यामुळे जयसिंगपूर पालिका उपनगराध्यक्ष निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. ताराराणी आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक निश्चित झाला असून, शाहू आघाडीकडून स्वीकृत नगरसेवकपदी यड्रावकर की, सा. रे. पाटील गटाच्या कार्यकर्त्याला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्षपदी शाहू आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी देणार की, जुन्या जाणत्या सदस्याची निवड करणार याबाबतही उत्सुकता आहे. उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी १७ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम जाहीर केला होता; पण १६ डिसेंबरला या निवडीसाठी बोलाविलेल्या बैठका रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. हा आदेश देत असतानाच नगराध्यक्षांना अधिकार वाढविण्यात आले होते. मात्र, उपनगराध्यक्ष निवड नेमकी कशी होणार याबाबत संभ्रमावस्था होती. बुधवारी (दि. २१) शासनाने नगराध्यक्षांना बैठक बोलाविण्याचे अधिकार देण्याबाबत उपनगराध्यक्ष निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकारही देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिकेत राजर्षी शाहू विकास आघाडीचे १३ सदस्य संख्या आहे, तर ताराराणी आघाडीकडे नगराध्यक्ष पदासह नऊ सदस्य संख्या आहे. दोन सदस्य अपक्ष आहेत. दोन्ही आघाड्यांकडून प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. ताराराणी आघाडीने स्वीकृत सदस्य पदासाठी माजी उपनगराध्यक्ष शीतल गतारे यांचे नाव निश्चित केले आहे. १३ सदस्य असल्याने शाहू आघाडीकडे बहुमत आहे. उपनगराध्यक्ष निवडीसाठी नव्या नगरसेवकांची बैठक बोलाविण्याचे अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आले आहेत. यामुळे पालिकेतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. येत्या २६ डिसेंबरला या निवडी होण्याची शक्यता आहे. एकूणच उपनगराध्यक्ष निवडीवरून पालिकेतील राजकीय वातावरण तापत आहे. (प्रतिनिधी)उपनगराध्यक्षासाठी तर्कवितर्कअपक्ष दोन सदस्य आपल्याच आघाडीचे असल्याचे ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यामुळे ताराराणी आघाडीकडे स्वीकृतसह १२ सदस्य, तर शाहू आघाडीकडे स्वीकृतसह १४ सदस्य होणार आहेत. उपनगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्षांनाही मतदानाचा अधिकार शासनाने दिल्यामुळे ताराराणी आघाडीकडे १३ सदस्य संख्या होणार आहे. राजकीय चमत्कार घडला तर नेमका उपनगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा होणार याबाबतही तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.