शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: May 31, 2017 01:12 IST

रेणुकानगर-धारवट झोपडपट्टीच्या पुनर्वसनाची मागणी : त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : येथील रेणुकानगर व धारवट झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करावे, या मागणीसाठी मंगळवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने भेटलेल्या शिष्टमंडळाबरोबर बोलताना आमदारांनी दोन्हीही झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.येथील इंडस्ट्रियल इस्टेटलगत असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडून नामंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेणुकानगर व धारवट झोपडपट्टीतील नागरिकांनी वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान मिळावे, अशी मागणी नगरपालिकेकडे केली आहे. मात्र, झोपडपट्टीची जागा अन्य प्रकारच्या कारणासाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्याठिकाणची झोपडपट्टी हटविण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टीवासीयांना देण्यात आली. त्यामुळे मंगळवारी रेणुकानगर व धारवट झोपडपट्टीमधील नागरिकांनी आमदार हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.आमदार हाळवणकर यांच्या कार्यालयावर आलेला मोर्चा पोलिसांनी अडविला. माकपच्यावतीने दत्ता माने, भाऊसाहेब कसबे, सदा मलाबादे, आदींचे एक शिष्टमंडळ आमदार हाळवणकर यांना भेटले. त्यावेळी आमदार हाळवणकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर शिष्टमंडळाशी बोलताना त्यांनी झोपडपट्टी नियमित करून त्याठिकाणी घरकुल योजना राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले. आंदोलनामध्ये अंबादास कुणगिरी, श्रीनिवास फुलपाटी, मालन कांबळे, सुमन काळे, मंजू मोरे, आदीं सहभागी झाले होते.इचलकरंजीत झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी निघालेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळासमोर बोलताना आमदार सुरेश हाळवणकर. यावेळी सदा मलाबादे, दत्ता माने, भाऊसाहेब कसबे, अंबादास कुणगिरी, डॉ. प्रशांत रसाळ, आदी उपस्थित होते.