शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 नेते, कार्यकर्ते यांच्या भूमिकेपुढे पक्षही हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:44 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आपल्याला सोईची असणारी भूमिका घेणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांसमोर पक्षही हतबल झाल्याचे ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आपल्याला सोईची असणारी भूमिका घेणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांसमोर पक्षही हतबल झाल्याचे चित्र प्रामुख्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. कारवाई करायची झाली तरी कितीजणांवर कारवाई करायची असा प्रश्न असून आणि चार महिन्यानंतरच्या विधानसभेवेळी कुणाला बरोबर घेऊन फिरायचे, असा प्रश्न पक्षांसमोर आहे.आमदार सतेज पाटील हे कॉँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेत्यांमधील एक नेते आहेत. मात्र महाडिक विरोधासाठी त्यांनी उघडपणे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी ताकद लावली आहे. अगदी वाढदिवसाला सुद्धा ‘आमचं ठरलंय’ अशा मथळ्याखाली जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत; परंतु पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस कॉँग्रेस पक्ष दाखवणार नाही, हे वास्तव आहे. अगदीच दाखविण्यासाठी काही नगरसेवकांवर नोटिसा काढण्याची कारवाई केली जाईल.आजºयामध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले सदस्य जयवंतराव शिंपी यांनी मुलाच्या माध्यमातून सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजय मंडलिक यांच्यासाठी राबणूक सुरू केली आहे, हे अखंड तालुका पाहतोय; परंतु त्यांच्यावर कारवाई करणार कोण? पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांचे नेतृत्व मानणारे माजी आमदार दिनकरराव जाधव आठ दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटून गेले होते आणि त्यांनी दोनच दिवसांपूर्वी मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांच्यावर कारवाई कुणी करायची?दुसरीकडे, भाजपमध्येही स्थिती वेगळी नाही. महायुतीच्या प्रचारामध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक येणार नाहीत, हे पक्षानेही गृहीत धरले आहे. त्यामुळे किरकोळ काही पदाधिकाऱ्यांवर नोटिसा काढून निलंबनाची कारवाई केल्याचे दाखविले जाईल. जसे राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील काही नगरसेवक मंडलिक यांचे काम करीत आहेत, तसेच भाजपचे काही नगरसेवक महाडिक यांच्यासाठी राबत आहेत, हे वास्तव आहे.आजºयाचे अशोक चराटी यांच्या गटाची पूर्ण ताकद शिवसेनेला नसल्याची तक्रार आहे. तिथल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनाही पवार यांना बोलावून घेण्याची वेळ आली. दक्षिणमधील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, मुरगूडचे रणजितसिंह पाटील हेदेखील राष्ट्रवादीसोबत उघडपणे आहेत. शिवसेनेतीलही काही पदाधिकारीही ‘स्लो’ झाल्याचे दिसते. श्रीपतराव शिंदे जरी पवार यांना भेटून गेले असले तरी त्यांचे काही कार्यकर्ते आधीपासूनच मंडलिकांच्या प्रचारात आहेत. हातकणंगले मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष जनसुराज्य अजूनही शांत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना मुभा दिल्याचे सांगण्यात येते. अनेक ठिकाणी नवी भाजप, जुनी भाजप असा वाद आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण इंगवले हे धैर्यशील माने यांच्या प्रचारात नसल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे एकूणच सर्वत्र सावळागोंधळ दिसून येत आहे.विधानसभेला काय करायचे ?आत्ताच बंडखोरांवर कारवाई करून त्यांना काढून टाकले तर येणाºया विधानसभेवेळी काय करायचे हादेखील पक्षासमोरचा प्रश्न आहे. पूर्वी कॉँग्रेसमध्ये तत्काळ निलंबनाची कारवाई केली जायची; परंतु जिथे प्रदेशाध्यक्षच हतबल होऊन राजीनाम्याची भाषा करतात, तिथे निलंबन कुणाचे आणि कोण करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे हे आठ दिवस रेटून नेऊन विषय संपवायचा, असे पक्षाचे धोरण दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक