शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर मोफत बाळंतपणे

By admin | Updated: November 18, 2016 00:51 IST

रंगनाथ हॉस्पिटलचा उपक्रम : ‘नोटा रद्द’मुळे निर्णय; रुग्णांना दिलासा

कोल्हापूर : केंद्र सरकारने मोठ्या रकमेच्या नोटा रद्द केल्याने गोरगरिबांची कुचंबणा होत आहे. त्यातून दिलासा मिळावा यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व येथील रंगनाथ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी १५ डिसेंबरपर्यंत बाळंतपणे, पोटविकारावरील अत्यावश्यक सेवा आणि स्त्री रोगाशी निगडित सर्व सेवा मोफत देण्याचे ठरविले आहे. डॉ. हेंद्रे यांनीच स्वत: निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.डॉ. हेंद्रे यांचे हे हॉस्पिटल ताराबाई पार्कातील पर्ल हॉटेलजवळ आहे. पंतप्रधानांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे सामान्य नागरिकांना चलनाची अडचण जाणवत आहे.कोणताही रुग्ण उपचारासाठी आल्यास त्यास नकार देऊ नये, असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने केले आहे. आमदार अमल महाडिक यांनीही अशा अडचणीच्या काळात रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून आपण हा निर्णय घेतला आहे व शाहूंच्या करवीरनगरीत कोणी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे डॉ. हेंद्रे यांनी म्हटले आहे. रुग्णांना लागणारी औषधे व भूलतज्ज्ञांची सेवा मिळाल्यास अधिक सोयीचे होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.