शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'डे केअर सेंटर'

By admin | Updated: September 30, 2016 09:31 IST

घरी एकटे असणाऱ्या ज्येष्ठांशी बोलण्यासाठी फारसा वेळ कुणालाच नसतो,हीच कुचंबणा लक्षात घेत दिलीप घाटे यांनी आपुलकीच्या गप्पांसाठी कोल्हापुरात ज्येष्ठांसाठी ‘डे केअर सेंटर’ उपक्रम सुरू केला आहे.

एक आॅक्टोबर रोजी साजरा केला जातो 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिन'..संतोष तोडकर, ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. ३० -  एकल कुटुंबपद्धतीचा उदय शहरी संस्कृतीत झपाट्याने होत आहे. त्यामुळे घरी एकटे असणाऱ्या ज्येष्ठांशी बोलण्यासाठी फारसा वेळ कुणालाच नसतो. त्यांची हीच कुचंबणा लक्षात घेत दिलीप घाटे यांनी आपुलकीच्या गप्पांसाठी कोल्हापुरात ज्येष्ठांसाठी पाळणाघर (‘डे केअर सेंटर’) हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.काही वेळेस एकट्याच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना धाक दाखवून चोरीच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे घरी कोणी ज्येष्ठ एकटे असतील तर मुलांनाही कामावरून परत जाईपर्यंत काळजी वाटत असते तसेच सेवानिवृत्तीनंतर करायचे काय हा प्रश्न अनेक ज्येष्ठांना सतावत असतो. मुले-मुली, सुना आपापल्या उद्योग व्यवसाय व करियरच्या धावपळीत इतकी मग्न होऊन जातात की त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळत नाही. ‘आपल्याशीही कुणी तरी बोलावं’ अशी खूप इच्छा त्यांच्या मनात असते. किमान समवयस्कांशी गप्पा मारता याव्यात असे वाटत असते, यामधून ‘ज्येष्ठ स्त्री-पुरुषांसाठी पाळणाघर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रतिभानगर येथील स्वत:च्या फ्लॅटमध्ये हा उपक्रम घाटे यांनी सुरू केला असून समवयस्कांमध्ये मनमोकळेपणाने दिवस घालविणे, आपली सुख-दु:खे वाटून घेणे आणि उतारवयात होणारी मानसिक घुसमट कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. काही वेळेस आयुष्याचा जोडीदार सोडून गेल्याने वाट्याला आलेला एकटेपणा असह्ण असतो. अशावेळेस गप्पा मारायला किंवा बोलावयास कोणीतरी लागते. आजूबाजूची सर्व मंडळी आपापल्या व्यापात बुडालेली असतात. त्यांना बोलावयास वेळही मिळत नाही. त्यांचेही काही चुकीचे नसते. घड्याळाबर हुकूम चालणाऱ्या आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या इतक्या असतात की मनात असूनही त्यांना वेळ काढून घरातील ज्येष्ठांशी गप्पा मारणे जमत नाही. घरातील तरुण मंडळींनी वेळ काढून गप्पा मारण्याचे ठरविले तरी पिढीतील तफावतींमुळे त्या दोघांचे विचार जुळतीलच असे नाही. तरुणपिढीने तसेच ज्येष्ठ मंडळींनी एकमेकाला समजून घेऊन सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची परिणीती सुसंवादात होईलच याची खात्री नाही. ज्येष्ठ मंडळी ही समवयीन ज्येष्ठ मंडळींत अधिक रमतात. समवयस्कांमध्ये त्यांचे विचार अधिक चांगल्यारितीने फुलण्यात ‘डे केअर सेंटर’ उपयुक्त ठरेल.

काय आहे हा उपक्रम :* विनामूल्य प्रवेश* वैयक्तिक माहितीचा फॉर्म भरून देणे आवश्यक * सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत समवयस्कांशी मजेत वेळ घालविण्याचे ठिकाण* स्वत:हून यावे किंवा मुले वा कुटुंबातील सदस्यांनी आणून सोडावे* स्वत: पुरते जेवण व गरजेची औषधे घेऊन यावे* कॅरम, बुद्धिबळ, पत्ते, लोडो, व्यापार आदी खेळांचे साहित्य मोफत उपलब्धहा उपक्रम कोणत्याही व्यावसायिक हेतूने सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वांना मुक्त प्रवेश आहे. समवयस्कांशी गप्पा-गोष्टी कराव्यात. शेअरिंग, चर्चा व्हाव्यात हा उद्देश आहे. जस-जसे लोक या उपक्रमाशी जोडले जातील त्यांच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला, विविध तज्ज्ञांची व्याख्याने, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. - दिलीप घाटे