शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त संचालक पदे भरण्याचा सहकारी संस्थांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:37 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांची रिक्त पदे भरण्याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट आदेश काढले ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांची रिक्त पदे भरण्याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट आदेश काढले आहेत. ज्या संस्थांची निवडणूक होऊन अडीच वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल, तर त्यांना रिक्त पदे भरण्याची मुभा संचालक मंडळाला दिलीआहे. त्यासाठी निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवावी लागणार आहे. निवडणुकीपासून अडीच वर्षांच्या आत पद रिक्त झाले असेल तर तिथे थेट निवडणूकच घ्यावी लागणार आहे.सहकारी संस्थांच्या निवडणूक नंतर संचालक मंडळातील एखादे पद काही कारणांनी रिक्त झाले तर त्या जागेसाठी वर्षा-दीड वर्षात निवडणूक लावणे संस्थांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होते. त्यामुळे अनेक संस्थांत पदे रिक्तच ठेवली जायची अथवा स्वीकृत करून घेतले जायचे. मग ही नियुक्ती अधिकृत की अनधिकृत हा वाद न्यायालयात जायचा. याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्टता देणारे परिपत्रक २६ आॅक्टोबर रोजी जारी केले आहे.तीन संस्थांतीलपदे भरण्याचा मार्ग मोकळाकोल्हापूर जिल्हा बॅँक, कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) व शेतकरी संघ या संस्थांच्या निवडणुका होऊन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने स्वीकृत म्हणून पदे भरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.नोटीस देऊन अर्ज मागवावे लागणाररिक्त पदासाठी संस्था व निबंधक कार्यालयाच्या नोटीस फलकावर जाहीर करून अर्ज मागवावे लागणार आहेत. या नोटिसीचा पंचनामा करण्याबरोबरच अर्ज सादर करण्यासाठी सात ते पंधरा दिवसांचा कालावधी देणे संस्थांना बंधनकारक राहणार आहे.दोनच पदे स्वीकृतीने भरता येणाररिक्त पदे स्वीकृत पद्धतीने भरण्यासाठी संस्था संचालकांच्या कालावधीत दोनपेक्षा अधिक पदे भरता येणार नाहीत. दोन भरल्यानंतर आणखी एखादे रिक्त राहत असेल तर ते पद निवडणुकीद्वारे भरावे लागेल. त्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करायचा आहे.