शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाच्या कामात विघ्नच विघ्न!

By admin | Updated: June 17, 2016 23:52 IST

पाच टप्प्यात काम : रत्नागिरी-कोल्हापूर प्रकल्प प्राधिकरणकडे

प्रकाश वराडकर --- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच भूसंपादनाच्या कामात विघ्नच विघ्न समोर येत आहेत. त्यातून वाट काढण्याचे जोरदार प्रयत्न राष्ट्रीय महामार्गच्या रत्नागिरी विभागाकडून सुरू आहेत. कशेळी ते झाराप या मार्गावर पाच टप्प्यात चौपदरीकरणाचे काम होणार असून, त्यातील तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश देणे बाकी असून, उर्वरित दोन टप्प्यांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात कशेळी ते झाराप (गोवा) या मार्गावर पाच टप्प्यात काम होणार आहे. त्यातील खवटी ते परशुरामघाट (१६१.६०० ते २०५.४०० किलोमीटर), आरवली ते तळेकांटे (२४१.२०० ते २८१.२०० किलोमीटर) व तळेकांटे ते वाकेड (लांजा) (२८१.२०० ते ३३२.२०० किलोमीटर) या तीनही टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश निघणे बाकी आहे. त्यानंतर या तीनही टप्प्यांची कामे सुरू होणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील या टप्प्यांमध्ये समाविष्ट नसलेल्या मार्गावरील काही अंतरात अनेक अडचणींचा सामना महामार्ग विभागाला करावा लागत आहे. त्यामध्ये बाजारपेठा, घरे, प्रार्थनास्थळे यांचा समावेश आहे. बाजारपेठांमधून चौपदरीकरणाचे काम पुढे कसे न्यावे, याबाबतचे आव्हान अद्याप कायम आहे. तीन टप्प्यांतील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी पेण विभागाकडे असलेल्या कशेळी ते खवटी व रत्नागिरी विभागाकडे असलेले वाकेड ते झाराप या दोन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभाग सुत्रांकडून सांगण्यात आले. पनवेल - महाड - पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. गेल्या दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या काळात मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांची श्रुंखलाच सुरू आहे. अनेक अपघात होऊन त्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाला डेड ट्रॅक म्हणूनही ओळखले जाते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली. सुमारे ५ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे.दोन टप्पे बाकी : तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्णरत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात एनएचएआयकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडेच असून, त्याबाबत या विभागाने सज्जता केली आहे.