शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

चौदा ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज?

By admin | Updated: June 29, 2015 00:20 IST

जत तालुका : निवडणुका लक्षवेधी होण्याची शक्यता, मोर्चेबांधणीस वेग

संख : जत तालुक्यातील पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १४ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार आहे. निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी गावपातळीवरील कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत. तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या निवडणुका लक्षवेधी होणार आहे. तालुक्यात लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने होणार आहेत. सध्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून प्रभागनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत.तालुक्यातील भिवर्गी, सावडवाडी, गुड्डापूर, गुगवाड, मोरबगी, सनमडी, शेगाव, सिंगनहळ्ळी, सोनलगी, उटगी, वळसंग, उंटवाडी, अंकलगी, घोलेश्वर, करेवाडी (तिकोंडी), कुडणूर, कुलाळवाडी, निगडी बु।।, शेड्याळ, लमाणतांडा (उटगी), तिकोंडी, टोणेवाडी, येळदरी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, लमाणतांडा (दरीबडची), मेंढेगिरी, उमराणी, अंकले, डोर्ली या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.शेगाव, मेंढेगिरी, टोणेवाडी, सोनलगी, घोलेश्वर, सिंगनहळ्ळी, धावडवाडी, टोणेवाडी, मोरबगी, कुलाळवाडी या गावांच्या निवडणुका चुरशीने होणार आहेत. येथील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १९ ग्रामपंचायतींमध्ये मताधिक्य मिळाले होते, तर राष्ट्रीय कॉँग्रेसला ८ ग्रामपंचायतींमध्ये, राष्ट्रवादी कॉँग्रेसला ३ ग्रामपंचायतींमध्ये मताधिक्य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमध्ये कॉँग्रेसचे विक्रम सावंत विजय झाले आहेत. आ. विलासराव जगताप यांच्या गटातून सुरेश शिंदे, बसवराज पाटील (जनसुराज्य) बाहेर पडले आहेत. त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे.(वार्ताहर) बिनविरोधची परंपरा राखणार काय?पूर्व भागातील जालिहाळ खुर्द, मोरबगी, कुलाळवाडी, सोनलगी, लमाणतांडा (दरीबडची) या ग्रामपंचायतींच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध होतात. यापैकी जालिहाळ खुर्द या ग्रामपंचायतीची निवडणूक स्थापना झाल्यापासून सलग दहावेळा बिनविरोध झाली आहे. यावेळी अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. यावेळीही निवडणूक बिनविरोध होणार आहे. कुलाळवाडी, लमाणतांडा (द. ब.), करेवाडी (तिकोंडी) ग्रामपंचायती एकवेळ पंचवार्षिक निवडणुकीचा अपवाद वगळता बिनविरोध झाल्या आहेत. याहीवर्षी बिनविरोधची परंपरा राखणार, की निवडणुका होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.सरपंच आरक्षणाचा घोळसरपंच आरक्षणामध्ये गुड्डापूर ग्रामपंचायतीचे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. पण अनुसूचित जमातीची लोकसंख्याच नाही. त्यामुळे सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंच कारभार पाहणार आहेत. अंकलगी सरपंच सलग दुसऱ्यावेळी इतर मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची पुनरावृत्ती होऊन जनसुराज्य, वसंतदादा आघाडीचे सुरेश शिंदे व राष्ट्रीय कॉँग्रेस एकत्र येऊन लढविणार काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.