शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव येथे चार शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू

By admin | Updated: March 24, 2017 00:16 IST

सातारा तालुक्यातील घटना : दोन सख्ख्या भावंडांचा समावेश

अंगापूर : मुळीकवाडी (तासगाव), ता. सातारा येथील चार शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुळीकवाडी येथील कुरणाचा ओढ्यालगत असणाऱ्या विहिरीत पोहण्यासाठी गावातीलच शाळकरी चार मुले गेली होती. यामध्ये दोन सख्ख्या भावंडांचाही समावेश होता. विहिरीत पोहताना चौघेही बुडाले. मात्र, सायंकाळपर्यंत याची कोणालाही माहिती नव्हती. सायंकाळच्या पाचच्या सुमारास तेथून जाणाऱ्यांना विहिरीवर कपडे दिसली. त्यावरून अंदाज बांधून चौकशी केल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये सिद्धार्थ संतोष कांबळे (वय ११), अक्षय विश्वास काळभोर (१२), करण सुनील कांबळे (११) आणि त्याचा सख्खा भाऊ राजरत्न सुनील कांबळे (१३) यांचा समावेश आहे.दरम्यान, तासगावचे पोलिस पाटील रामपुरी गोसावी यांनी घडलेल्या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिस स्टेशनला दिली. ही माहिती मिळताच सातारा तालुका स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. जी. नाळे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळवर आले. (वार्ताहर) विहिरीत १५ फूट पाणीसाठा...सायंकाळी उशिरा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या विहिरीत सुमारे १५ फूट पाणी होते. रात्री उशिरा सातारा येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आले होते. दरम्यान, सख्ख्या भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळीच या मुलांची आई आजारी असल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.