कोल्हापूर : रोटरी क्लबने आयोजित केलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय वाटप शिबिरात चारशे गरजू दिव्यांग व्यक्तींच्या हाता-पायांची मापे घेण्यात आली. मापे घेण्यात आलेल्या उपकरणांचे दिव्यांगांना महिन्यांत वाटप केले जाणार आहे.
रोटरी क्लब, कोल्हापूर व इचलकरंजी सिटी आणि पुण्यातील साधू वाधवानी मिशनच्यावतीने रोटरी समाज सेवा केंद्र, नागाळा पार्क येथे या शिबिराचे उदघाटन भावी गव्हर्नर नासीर बोरसादवाला यांच्याहस्ते व करुणाकर नायर यांच्या उपस्थितीत झाले. या उपक्रमातून अनेक दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात व पाय मिळू शकणार आहेत. हे हात व पाय अद्ययावत टेक्नाॅलाॅजीच्या फायबरपासून बनविले जाणार आहेत. अत्यंत हलके व मजबूत असून, ते हातापायांद्वारे दिव्यांग व्यक्तींना चालणे, अगदी टेकडीसुद्धा चढणे शक्य आहे. याशिवाय सायकलिंगही करता येणे शक्य आहे. सर्व दैनंदिन कामे करणेही शक्य आहे. यावेळी रोटरी कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुघ, कुशल राठोड, नीलेश कुत्ते आदी सभासद उपस्थित होते.
फोटो : ०९०९२०२१-कोल-रोटरी
आेळी : कोल्हापुरात रोटरी समाज सेवा केंद्रात रोटरी क्लब, कोल्हापूर व इचलकरंजी आणि साधू वाधवानी मिशनतर्फे आयोजित कृत्रिम हात-पाय मोफत वाटप शिबिराचे उद्घाटन नासीर बोरसादवाला यांच्याहस्ते झाले. यावेळी अजिंक्य कदम, अमित माटे, कुशल राठोड, मेघराज चुघ, जेठाभाई पटेल, करुणाकर नायक आदी मान्यवर उपस्थित होते.