शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

‘गडहिंग्लज’ला तीन दशकांत चार पोटनिवडणुका

By admin | Updated: July 7, 2016 00:50 IST

नगरपालिका निवडणूक : तीनदा जनता आघाडीची, तर एकदा जनता दल-जनसुराज्य शक्ती पक्षाची बाजी

राम मगदूम -- गडहिंग्लज --गेल्या तीन दशकांत गडहिंग्लज नगरपालिकेच्या चार पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी तीन निवडणुकीवेळी जनता आघाडी, तर एका निवडणुकीत काँगे्रसप्रणित सर्वपक्षीय शाहू आघाडी सत्तेवर होती. कारणे निरनिराळी असली तरी चारही पोटनिवडणुकीत जनता आघाडीनेच बाजी मारल्याचे दिसून येते. मात्र, यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी असल्यामुळे संभाव्य पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.१९८७ : प्रभाग (२१) : जनता आघाडीचे नगराध्यक्ष दादा पेडणेकर यांनी आघाडीचे नगरसेवक अविनाश अलूरकर यांचा ‘तथाकथित’ राजीनामा मंजूर केला. त्यामुळे झालेली पोटनिवडणूक जनता आघाडीच्याच आनंदराव पाटील यांनी ४२७ मतांच्या फरकाने जिंकली. त्यावेळी सर्वपक्षांच्या पाठिंब्यावर लढलेले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार दिलीप देसाई यांचा पराभव झाला.१९९२ : प्रभाग (१३) : १९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता आघाडीच्या शंकर मदिहाळी यांच्यावर केवळ ७ मतांनी विजय मिळविलेले काँगे्रसचे गुरूलिंग स्वामी यांचे वर्षातच आकस्मिक निधन झाले. त्यानंतर १९९२ मध्ये तिरंगी पोटनिवडणूक झाली. त्यात मदिहाळी यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे दिलीप बेळगुद्री यांचा १८० मतांनी पराभव केला. दुसरे प्रतिस्पर्धी काँगे्रसचे बाळ पाटील यांना ८३ मते मिळाली होती.१९९८ : प्रभाग (१४) : १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले जनता आघाडीचे किरण शिंदे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व पक्षांच्या पाठिंब्यावर लढलेले अपक्ष उमेदवार रमेश परीट यांचा जनता आघाडीच्या शिवाजीराव गवळी यांनी ५० मतांच्या फरकाने पराभव केला.२००८ : प्रभाग (४) : २००६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसुराज्यच्या प्रेमा विटेकरी यांच्यावर १० मतांनी विजय मिळविलेल्या राष्ट्रवादीच्या रेश्मा कांबळे यांच्याविरोधात वयाच्या अटीची पूर्तता होत नसल्याच्या कारणावरून त्यांच्या प्रतिस्पर्धी विटेकरी यांनी तक्रार केली. त्यामुळे कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यानंतर २००८ मध्ये पुन्हा त्याच दोघींत पोटनिवडणूक झाली. यामध्ये ‘जनता दल-जनसुराज्य’च्या विटेकरी यांनी १६५ मतांनी बाजी मारली.नेत्याचा पराभव.. नैतिकता अन् टोपी !१९८६ मध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या चुकीच्या मतदानामुळे जनता आघाडीचे नेते श्रीपतराव शिंदे यांचा पराभव झाला. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अविनाश अलूरकर यांनी नगरसेवकपदाचा बिनतारखेचा राजीनामा पक्षप्रतोद दादा पेडणेकर यांच्याकडे दिला होता. ‘तो’ राजीनामा पेडणेकरांनी नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपल्या अधिकारात परस्पर मंजूर केल्यामुळे अलूरकरांच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक झाली. यंदाची पोटनिवडणूक का लागली ?२०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ३ अ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सुंदराबाई बिलावर यांनी वर्षापूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा ‘व्हिप’ झुगारून विरोधी जनता दलाचे राजेश बोरगावे यांच्याबाजूने मतदान केले. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे.