शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘स्पॉट बिलिंग’चा फज्जा

By admin | Updated: May 24, 2016 00:59 IST

राज्यातील पहिलीच योजना : नियोजनाअभावी गोंधळ

तानाजी पोवार --कोल्हापूर -पाणीपुरवठा विभागाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘स्पॉट बिलिंग’च्या केलेल्या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रत्यक्षात जागेवर जाऊन मीटरमधील रिडिंग पाहून तत्काळ जागीच बिल देण्याची ही योजना तशी चांगली असली, तरी त्याप्रमाणे पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे कनेक्शनधारकांच्या तक्रारी कमी होण्यापेक्षा त्या अधिकच प्रमाणात होऊ लागल्या आहेत. तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ग्राहकांना बिले मिळत आहेत. कोल्हापूर शहरात महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी दर दोन महिन्यांनी ग्राहकांच्या हाती पाणी बिले पडत होती. या बिलात अनेक चुका असत. अनेकांना चक्रावून सोडणारी वाढीव रक्कमेची बिले हाती पडू लागल्याने नागरिकांतून तक्रारी वाढू लागल्या; पण त्यानंतर काही मीटर रिडर ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करून बिले कमी करून ती पुन्हा ग्राहकांच्या हाती देत असत. अनेकवेळा शहरातील इमारत बांधकामासाठी पाणी वापर हा व्यावसायिक असला, तरी मीटर रीडरच्या आशीर्वादाने घरगुती वापराची बिले हाती पडल्याची ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ केली जात होती. या अप्रत्यक्ष अपहाराला तसेच ग्राहकांकडून वाढणाऱ्या तक्रारींना फाटा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘स्पॉट बिलिंग’ची योजना कोल्हापूर शहरात ५ मार्चपासून सुरू केली. आॅनलाईनवरून ही बिले देण्याची योजना आहे; पण त्यासाठी तांत्रिक कर्मचारी वर्ग नसल्याचा अभाव येथे जाणवला. यासाठी महापालिकेच्यावतीने प्रत्येक कर्मचाऱ्यास एक चायना मेड मोबाईल, एक हँड प्रिंटर देण्यात आलेला आहे. यापैकी मोबाईलवर या पाणी बिलाबाबत सॉप्टवेअर व इंटरनेट लोड करून देण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात मीटरचे रिडिंग घेऊन ते नोंद करून तिची प्रिंट देण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे. तसेच यासाठी कर्मचारी वर्गही अपुरा आहे. त्यामुळे ही पाण्याची बिले ग्राहकांच्या हाती दोन महिन्यांत पडण्याऐवजी ती चार ते पाच महिन्यांनी हाती पडू लागली आहेत. दरम्यान, ताराबाई पार्क परिसरातील मीटर रिडरच्या प्रिंटर यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे हा हँड प्रिंटर गेली महिनाभर बंद आहे. हा प्रिंटर दुरुस्तीसाठी दिल्यामुळे या मीटर रिडरने आता काही दिवसांपासून पूर्वीप्रमाणेच नोंदवहीत रिडिंग घेऊन त्याची बिले दिली जात आहेत. (क्रमश:)चार महिने उशिरा असा स्पॉट बिले तयार करताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईल रेंज, आदी अडथळ्यांची शर्यत पार करत एका कर्मचाऱ्यांकडून प्रतिदिनी ३० बिले तयार होतात. अशी ४५ कर्मचाऱ्यांमार्फत एका दिवशी सुमारे १३०० बिले परिपूर्ण होऊन ग्राहकांच्या हाती दिली जातात. अशी सुमारे १३०० बिले महिन्यातील २५ दिवस काम केल्यानंतर सुमारे ३३,५०० पर्यंत होतात. याशिवाय अशा पद्धतीने तीन महिने काम केल्यानंतर सुमारे एक लाख बिलांचा स्पॉट बिले परिपूर्ण होऊन ग्राहकांना मिळतात. याशिवाय बिलिंगच्या प्रिटिंग मशीन अडथळा, कर्मचाऱ्यांची रजा, सुटी याचा विचार करता एक बिल दिल्यानंतर पुन्हा ते पुढील बिल देण्याची प्रक्रिया येईपर्यंत सुमारे चार महिन्यांचा कालावधी उलटत आहे.