शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:00 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९०३ इतकी ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९०३ इतकी आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची रक्कम तीन कोटी २३लाख तीन हजार ९३६ आहे. ही माहिती कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने राज्य शासनाला सादर केली आहे. विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्राचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे.विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील पूरबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या प्रथम सत्राचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील १८ महाविद्यालयांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. या महाविद्यालयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून मदतीसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके खरेदीसाठी विद्यापीठाकडून अर्थसाहाय्य देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यतादिली आहे. उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने शासन आदेशानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या एकूण २१४ महाविद्यालयांतील पूरबाधित विद्यार्थ्यांची माहिती गेल्या १५ दिवसांत संकलित केली. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, विधी (लॉ) आणि शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विद्यापीठाकडे विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या २३ महाविद्यालयांनी माहिती सादर केली आहे.महापुराचा फटका बसलेल्यासंबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.या महाविद्यालयांना मदतगोपाळकृष्ण गोखले कॉलेज, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (हलकर्णी), कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन (नागाळा पार्क), श्री शहाजी छत्रपती कॉलेज, महावीर महाविद्यालय, म. ह. शिंदे महाविद्यालय (तिसंगी), एस. के. पाटील महाविद्यालय (कुरुंदवाड), एस. के. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय (प्रयाग चिखली). सांगली : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, ललितकला व नाट्यतंत्र शिक्षण महाविद्यालय, पुतळाबेन शाह कॉलेज आॅफ एज्युकेशन, गणपतराव अरवाडे कॉलेज, बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, आबासाहेब गरवारे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट. कºहाड : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय.