शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील निधन (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST

अनेक वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास सुरू होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात ...

अनेक वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास सुरू होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाटील यांच्या निधनाने शिक्षण विभागातील एक जाणकार व्यक्ती हरविल्याची भावना शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत होती.

मनमिळाऊ स्वभावाचे आर. डी. पाटील (वडगावकर) हे मूळचे भादोले गावचे होते. पेठवडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांनी तीस वर्षे प्राचार्य म्हणून काम केले. येथेच वडगावला स्थायिक झाले.

वडगाव पालिकेत यादव पॅनेल आघाडीतून प्रथमच १९९१ ला विजयी झाले. यावेळी त्यांना विरोधी गटनेत्याची संधी मिळाली होती, तर १९९६ ला स्वीकृत, तर २००६ या पुन्हा वडगावचे नगरसेवक म्हणून संधी मिळाली होती.

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक म्हणून १९९४ पासून ते कार्यरत होते. २०१० ते २०१९ पर्यंत ते संस्थेचे व्हाईस चेअरमन होते.

त्यानंतर डी. बी. पाटील यांच्या पश्चात त्यांची १ नोव्हेंबर २०१९ ला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली होती. दुपारी आर. डी. पाटील (वडगावकर) यांचे पार्थिव संस्थेच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. येथे दुपारी दर्शन घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व्ही. जी. बोराडे, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, मुख्याध्यापक व संचालक आर. डी. पाटील, विनय पाटील, के. जी. पाटील, सविता पाटील, प्राचार्य आर. डी. पाटील, माजी प्राचार्य आर. सी. गोडसे, अजीव सेवक सी. एम. गायकवाड उपस्थित होते. त्यानंतर पेठवडगाव येथील नवीन वसाहती घरी पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. किणी रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पेठवडगाव येथे पाटील यांना आमदार जयंत आसगावकर, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, प्राचार्य प्रदीप पाटील, प्राचार्य एन. के. शिंदे, बी. जी. बोराडे, अशोक माने, आर. डी. पाटील (तांदूळवाडीकर), डी. एस. घुगरे, गुरूप्रसाद यादव, आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

मान्यवरांनी घेतले पाटील यांचे अंत्यदर्शन

माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा परिषद सदस्य डाॅ. अशोक माने, डी. एस. घुगरे, आदींसह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.