शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार हाळवणकरांनी रस्ते कामात पाच कोटी घेतल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी १०७ कोटींच्या रस्ते कामात पाच कोटी घेतल्याचा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी १०७ कोटींच्या रस्ते कामात पाच कोटी घेतल्याचा आरोप नगरसेवक सागर चाळके यांनी नगरपालिका सर्वसाधारण सभेत केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आरोप मागे घेण्याची मागणी करत भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासमोर ठिय्या मांडला, तर आरोपावर ठाम असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनीही ठिय्या मारला. त्यामुळे गोंधळातच आणखीच भर पडली. अखेर याबाबत निषेध व्यक्त करून कामकाज पूर्ववत सुरू केले.

विविध ७३ व ऐनवेळचे पाच अशा ७८ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात बुधवारी सभा झाली. सभेत भगतसिंग उद्यानामध्ये खासगी ठेकेदारामार्फत बुलेट ट्रेन बसविण्याच्या विषयावर नगरसेवक शशांक बावचकर यांनी यापूर्वी बागेत बसविलेल्या ट्रेनचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला. तसेच सदर कामाच्या चौकशीची मागणी केली. या विषयावर चर्चा सुरू असताना कामातील टक्केवारीबाबतचा विषय चर्चेत आला. त्यावर नगरसेवक चाळके यांनी १०७ कोटींच्या रस्तेकामात माजी आमदार हाळवणकर यांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी चाळके यांनी केलेला आरोप बिनबुडाचा असून, तो मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. मात्र, चाळके हे आपल्या आरोपावर ठाम राहिल्याने भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनीही प्रत्युत्तर देत तुम्ही किती धुतल्या तांदळाचे आहात, असा प्रतिप्रश्न केल्याने हमरीतुमरी सुरू झाली. त्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ उडून तणाव निर्माण झाला.

भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा स्वामी यांच्यासमोर ठिय्या मारून आरोप मागे घेईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यांच्यापाठोपाठ चाळके यांच्यासह विरोधी नगरसेवकांनीही नगराध्यक्षांसमोर ठिय्या मारून आरोपावर ठाम राहिल्याने गोंधळात भर पडली. भाजपचे पक्षप्रतोद तथा उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी चाळके यांच्या आरोपाचा निषेध करीत सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची मागणी केली. त्यावर चाळके यांनी, चुकीच्या गोष्टींना पांघरूण घालत असाल तर त्याला माझा विरोध असून आपण निषेध करीत असल्याचे सांगितले. कॉँग्रेसचे नगरसेवक बावचकर यांनी, १०७ कोटींच्या कामाची ईडीमार्फत चौकशी करण्यासाठी सभागृहात ठराव करावा, अशी मागणी केली.

चौकट

सोशल मीडियावर चर्चेला ऊत

नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवकांकडून टक्केवारीची चर्चा, खुलेआमपणे एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप यांबाबत सोशल मीडियावर हा विषय चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली. तसेच नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानेच असे वक्तव्य सुरू झाल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या.

फोटो ओळी

३००६२०२१-आयसीएच-०१

आरोप-प्रत्यारोपानंतर या घटनेचा निषेध व्यक्त करीत दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांसमोर ठिय्या मारला.

३००६२०२१-आयसीएच-०२

नगरपालिकेच्या सभेत सागर चाळके यांनी आरोप केल्यानंतर भाजप नगरसेवकांनी पुढे येत आरोप मागे घ्या, असे म्हणून प्रत्यारोप केला.

सर्व छाया - उत्तम पाटील