शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांना अटक

By admin | Updated: October 8, 2016 01:25 IST

सहायक आयुक्त धमकी प्रकरण भोवले : जामिनावर सुटका

कोल्हापूर : महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन खाडे यांना प्रभाग समिती सभापतींच्या केबिनमध्ये कोंडून घालत धमकी दिल्याप्रकरणी नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती, माजी नगरसेवक प्रकाश आनंदराव गवंडी (वय ४४, रा. मस्कुती तलाव, शुक्रवार पेठ) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. शहरातील प्रश्नांसंबधी गुरुवारी (दि. ६) शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या सभेमध्ये माजी नगरसेवक प्रकाश गवंडी व महापालिका सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. सभा संपल्यानंतर गवंडी यांनी खाडे यांना सभापती अफजल पीरजादे यांच्या केबिनमध्ये बोलावून कोंडून घातले. यावेळी त्यांना बघून घेण्याची धमकी देत ते अंगावर धावून गेले. खाडे हे केबिनच्या बाहेर पडत असताना त्यांना तिथून जाण्यास मज्जाव केला. या प्रकारानंतर खाडे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त शिवशंकर हे स्वत: खाडे यांना घेऊन लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर खाडे यांनी या ठिकाणी गवंडी यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गवंडी यांच्यावर कोंडून घालणे, रस्ता अडविणे (३४१), धमकी देणे (५०६), आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी गवंडी यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांच्यासमोर हजर केले. यावेळी तपास अधिकारी डी. एम. गायकवाड यांनी आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेला गुन्हा गंभीर असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने गवंडी यांची जामिनावर सुटका केली. (प्रतिनिधी) --------------अटक टाळण्यासाठी नगरसेवकांची धडपड प्रकाश गवंडी यांना अटक होणार असे समजताच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, महापौर अश्विनी रामाणे यांचे सासरे मधुकर रामाणे, सभापती अफजल पीरजादे, नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, विनायक फाळके, बाबा इंदुलकर, आदींनी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेतली. गवंडी यांच्या विरोधातील ३४१ कलम मागे घ्या, त्यांना अटक करू नका, अशी विनंती सर्वांनी केली. त्यावर सावंत यांनी स्वत: आयुक्त तक्रार देण्यासाठी आले होते. गुन्हा दाखल झाला आहे; त्यामुळे कलम मागे घेऊ शकत नाही. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करणे हे आमचे काम असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरसेवकांनी सहायक आयुक्त सचिन खाडे यांनी नगरसेविका माधवी गवंडी यांना शिवीगाळ केली आहे. त्यांची तक्रार घ्यावी, अशी मागणी केली. सावंत यांनी तक्रार अर्ज दिल्यास आम्ही चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, असे आश्वासन दिले. --------------------सचिन खाडे यांच्याविरोधात तक्रार कचरा उठाव करण्याच्या समस्येवर सचिन खाडे यांना विचारणा केली असता त्यांनी लज्जा उत्पन्न होईल असे अपशब्द वापरले. या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार प्रकाश गवंडी यांच्या पत्नीने लक्ष्मीपुरी पोलिसांत केली. त्यानुसार पोलिसांनी खाडे यांच्याविरोधात कलताटकळत उभे ठेवले : प्रकाश गवंडी यांना शुक्रवारी दहा वाजता पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. काही नगरसेवक पोलिस निरीक्षक सावंत यांच्या केबिनमध्ये बसून होते. यावेळी गवंडी यांना पोलिसांनी केबिनच्या बाहेर ताटकळत उभे ठेवले होते. काही वेळाने ते आतमध्ये येऊन खुर्चीवर बसले. त्यावेळी त्यांना ‘बसू नका, उभे राहा,’ असे सांगण्यात आले. काही वेळ उभे राहून पुन्हा खुर्चीवर बसल्यानंतर सावंत यांनी अन्य पोलिसांना सांगून गवंडी यांना गुन्हे शाखेच्या केबिनमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना केबिनमध्ये आरोपीसारखे बसविले.