शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

माजी नगरसेवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 00:37 IST

खोट्या कागदपत्राद्वारे जमिनीची विक्री : आपटेनगर येथील सव्वातीन एकर जमीन विकून संजय कोळेकरकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

कोल्हापूर : आपटेनगर, पोदार इंग्लिश स्कूलजवळील सुमारे आठ कोटी किमतीच्या सव्वातीन एकर जमिनीचे बनावट कागदपत्रांद्वारे हक्क व विकसन करारपत्र करून काही भागांची परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक संजय पोपटराव कोळेकर (वय ५०, रा. शनिवार पेठ) यांना करवीर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांचा साथीदार बाबूराव मल्लाप्पा वाली (रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) हा फरार आहे. याप्रकरणी प्रशांत कृष्णात राऊत (रा. कसबा बावडा) व त्यांची बहीण मेघा मधुकर पाटील (रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी बोलताना दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, आपटेनगर येथे कृष्णात ज्ञानू राऊत यांची सव्वातीन एकर जमीन आहे. ती त्यांनी मुलगा प्रशांत राऊत व मुलगी मेघा पाटील (रा. शिगाव-सांगली), दीपाली रानमाळे (रा. मुरगूड, ता. कागल) यांच्या नावे केली. २००२ मध्ये त्यांनी बाबूराव वाली, तुकाराम सदाशिव सुतार (रा. बालिंगा, ता. करवीर), तानाजी शिवाजी देसाई (रा. वाशीनाका), अशोक नामदेव सूर्यवंशी (रा. बेळवडे, ता. राधानगरी), आदींना घेऊन पंचरत्न डेव्हलपर्स नावाची भागीदारी फर्म रजिस्टर केली. या फर्मच्या माध्यमातून आपटेनगर येथील जागा विकसित करणार असल्याने त्यांनी बाबूराव वाली यांच्या नावे वटमुखत्यार पत्र व पंचरत्न डेव्हलपर्सच्या नावे विकसन करार केला. या करारासाठी त्यांनी मुलगा प्रशांत, मुलगी मेघा पाटील व दीपाली रानमाळे यांची संमती घेतली नव्हती. दरम्यान, भागीदारी फर्ममध्ये त्यांच्यात वाद झाल्याने कृष्णात राऊत यांनी ३० सप्टेंबर २००२ रोजी विकसन करार रद्द केला. त्याची नोटीस त्यांनी फर्मला दिली. त्यास बाबूराव वाली सोडून इतर चौघांनी मान्यता दिली. त्यानंतर १ एप्रिल २०११ रोजी ही जमीन व्हिरोनिका डेव्हलपर्सचे संचालक दिलीप रामचंद्र मोहिते (रा. नागाळा पार्क) यांना वटमुखत्यार व विकसन करार रजिस्टर करून दिली. यावेळी त्यांनी मुलगा व दोन मुलींची संमती घेतली. त्यानंतर १२ एप्रिल २०१२ रोजी बाबूराव वाली व माजी नगरसेवक संजय कोळेकर यांनी परस्पर विकसन करार करारपत्र करून घेतले. परंतु राऊत यांनी २६ जुलै २०१३ रोजी हक्कसोडपत्र करून ही जमीन मुलगा प्रशांत, मुली मेघा पाटील व दीपाली रानमाळे यांच्या नावावर केली. सध्या या जमिनीचा ताबा तिघांकडे आहे. त्यांनी बाबूराव वाली, संजय कोळेकर यांच्याशी कोणताही करार केला नसताना त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे हक्क व विकसन करारपत्र करून जमिनीच्या काही भागाची विक्री केली. हा प्रकार मुलगा प्रशांत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व बहीण मेघा पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)