शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

जयसिंगपूर पालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना

By admin | Updated: July 4, 2016 00:38 IST

हरकतीची मुदत १५ जुलैपर्यंत : अंतिम आराखडा २७ जुलैपर्यंत जाहीर करण्याची मुदत

जयसिंगपूर : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे़ गतनिवडणुकीत सहा प्रभाग होते़ येणाऱ्या निवडणुकीत बारा प्रभाग असणार आहेत़ १५ जुलै पर्यंत हरकती घेण्याची मुदत असून, २७ जुलैपर्यंत अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे़ प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता थेट नगराध्यक्ष आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे़ जयसिंगपूर नगरपालिका अंतर्गत एकूण १२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत़ एका प्रभागात दोन असे चोवीस सदस्य निवडून द्यावयाचे आहेत़ व्दिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रचाराला आणि प्रभागात काम करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे़ प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे़ प्रभाग १ मध्ये रेल्वे स्टेशन मळा भाग, गणेश कॉलनी, गल्ली नंबर १, २, ३, ४, ५ व ६ चा भाग, कुंभार वसाहत, प्रभाग २ मध्ये गल्ली नंबर ६, ७, ८, ९, १० व ११ चा भाग व जुना उदगाव रस्ता ते कोल्हापूर-सांगली रस्त्यापर्यंतचा मळा भागाचा समावेश आहे़ प्रभाग ३ मध्ये कोकणे पाटील मळा ते गल्ली नंबर ५ व ६ चा प्रभाग, नवीन व मधील गल्ली नंबर ५, ६, ७, ८, आवटी कॉलनी, गर्ल्स हायस्कूलजवळील मळा भाग, राजीवनगर, गल्ली नंबर ६, ७ यांचा समावेश आहे़ प्रभाग ४ मध्ये राजीवनगर झोपडपट्टी, गल्ली नंबर ६, ७, ८, ९, खामकर मळ्याचा समावेश आहे़ प्रभाग ५ मध्ये गल्ली नंबर ८, ९ व ९ अ, ११ व १२, अजिंक्यतारा सोसायटी, राजीव गांधीनगर गल्ली नं़ ८, काडगे मळा यांचा समावेश आहे़ प्रभाग ६ मध्ये गल्ली नं़ १२ ते १६, शिवाजी हौसिंग सोसायटी, शिंदे कॉलनी, विकास कॉलनी, यड्रावकर कॉलनी, वरद कॉलनी, साई कॉलनी यांचा समावेश आहे़ प्रभाग ७ मध्ये संभाजीनगर, विद्यासागर सोसायटी, काडगे मळा, शिवाजी हौसिंग सोसायटी, गल्ली नं़ १७, १८, १९, यादवनगर, इंदिरानगर, प्रकाश हौसिंग सोसायटी यांचा समावेश आहे़ प्रभाग ८ मध्ये अजिंक्यतारा सोसायटी, यशवंत सोसायटी, रामनगर, महालक्ष्मीनगर, शाहूनगर, अवचित नगर, चाँदतारा मस्जिद परिसराचा समावेश आहे़ प्रभाग ९ मध्ये समडोळे मळा, यशवंत सोसायटी, हेरवाडे कॉलनी, खामकर मळा, दीपनगर, मारुती पार्क, दत्त कॉलनी, उज्ज्वलनगर, राजीव गांधीनगर यांचा समावेश आहे़ प्रभाग १० मध्ये शाळा नं़९ शाहूनगर समोरील भाग, रि़स़नंबर ९०, समडोळे मळा, अवचित नगर, शिवशक्ती कॉलनी यांचा समावेश आहे़ प्रभाग ११ मध्ये इंदिरा हौसिंग सोसायटी पश्चिम, डवरी सोसायटी, गणपती व जैन मंदिर परिसर, बायपास दक्षिणेकडील परिसर, सिध्देश्वर कॉलनी यांचा समावेश आहे़ प्रभाग १२ मध्ये गल्ली नं़ १९, २० व २१ चा भाग लक्ष्मी पार्क, आंबेडकर सोसायटी, ऩ पा़ नोकर हौसिंग सोसायटी, दीनबंधू, स्वप्ननगरी, प्रकाश हौसिंग सोसायटी, इंदिरानगर झोपडपट्टी यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)