शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेळकेंच्या रूपाने हातकणंगलेत ‘लाल दिवा’

By admin | Updated: January 30, 2016 00:11 IST

सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपदाचा दर्जा : काँग्रेस-राष्ट्रवादीला पंधरा वर्षांत जमले नाही

आयुब मुल्ला-- खोची --हातकणंगले तालुक्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन ‘लाल दिव्या’ची गाडी दिली. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांना यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. यासाठी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून हे पद मिळवून दिले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात एका सामान्य कार्यकर्त्याला राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे धाडस भाजप करते, असा चांगला संदेश चर्चिला जात आहे. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र पंधरा-वीस वर्षांत सत्ता असूनही असा सन्मान केला नाही. सामान्य शहरांतील कार्यकर्ते नगरसेवक झाले. नगराध्यक्ष झाले. त्यापलीकडे राज्यपातळीवर अलीकडच्या काळातील काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता असताना मोठे पद दिले नाही. याचा फटका पक्षवाढीवर निश्चितपणे झाला. राष्ट्रवादीच्या ताब्यातील इचलकरंजी मतदारसंघातील खासदारकी सुद्धा गेली. त्यामुळे विधानसभा, लोकसभा यापासून प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादीला दूर राहावे लागले.इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योगाचे मोठे जाळे आहे. सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी गटबाजीत अडकलेली आहे. तरीसुद्धा या पक्षाचे कार्यकर्ते भक्कम आहेत. अशा परिस्थितीत आमदार हाळवणकर यांनी आपली भूमिका कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी ठेवली. स्वत:ला महामंडळाचे अध्यक्षपद घेता आले असते; परंतु तसे न करता हिंदुराव शेळके यांच्यासाठी त्यांनी पक्ष पातळीवर प्रतिष्ठा पणाला लावली. यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी शेळके यांच्या रूपाने हातकणंगले तालुक्यात आणले. स्वत:ला नाही; परंतु कार्यकर्त्याला राज्य मंत्रिपदाचा दर्जा एक आमदार मिळवून देऊ शकतो ही सन्मान करणारी बाब आहे. यापूर्वी तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने केले नाही ते हाळवणकर यांनी केले. हा संदेश आता चर्चेचा विषय बनला आहे. यावरून नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.आवाडे, आवळे यांना मंत्रिपदहातकणंगले तालुक्यात दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अनुक्रमे प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांनी केले. आवाडे यांना दोनवेळा, तर जयवंतराव आवळे यांना २५ वर्षांत एकवेळा मंत्रिपद मिळाले; परंतु महामंडळाचे अध्यक्षपद मात्र कोणा सामान्य कार्यकर्त्याला मिळाले नाही.