शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘फॉरेन्सिक लॅब’ एप्रिलपासून

By admin | Updated: March 6, 2016 01:02 IST

चार जिल्ह्यांची सोय : पोलीस महासंचालक बोरवणकर यांच्याकडून जागांची पाहणी

कोल्हापूर : व्हिसेराच्या चाचणीचा रिपोर्ट तत्काळ मिळण्यासाठी नांदेडपाठोपाठ आता कोल्हापुरातही दि. १ एप्रिलपासून ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) सुरू होत आहे. कावळा नाका येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (बांधकाम) विभागाची इमारत काही वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. या लॅबमध्ये कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील ‘व्हिसेरा’ची चाचणी होणार आहे, अशी माहिती विधि आणि तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मृताच्या शवविच्छेदनावेळी शरीरातील किडनी, जठर, रक्त, मेंदू, आदी काढलेले भाग पुणे येथील औंध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचे रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्याने तपासकामास विलंब लागतो, अशा तक्रारी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून गृहविभागाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत गृहविभागाने नांदेडपाठोपाठ कोल्हापूरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नांदेडमध्ये १० फेब्रुवारी २०१६ रोजी फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आली. दि. १ एप्रिलपासून कोल्हापुरात लॅब सुरू करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार राज्याच्या विधि आणि तांत्रिक विभागाच्या प्रशासनाने कावळा नाका येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (बांधकाम) विभागाची इमारत भाडेतत्त्वावर घेतली. ‘फॉरेन्सिक लॅब’ला कायमस्वरूपी इमारत मिळावी, यासाठी कसबा बावडा येथील गोळीबार मैदान व कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील केर्ली येथील जागेची निश्चिती करण्यात आली होती. या जागेची पाहणी करण्यासाठी राज्याच्या विधि आणि तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालक बोरवणकर शनिवारी सकाळी कोल्हापुरात आल्या. त्यांनी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर कावळा नाका येथील इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर गोळीबार मैदान व केर्ली येथील जागांचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून फॉरेन्सिक लॅबला पाठविलेल्या ‘व्हिसेरा’चा तपासणीचा अहवाल लवकर प्राप्त होत नसे; त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांचे तपास लांबणीवर पडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यांची दखल घेत कोल्हापूरला फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यासाठी मंजुरी दिली. त्यासाठी तात्पुरती भाडेतत्त्वावर इमारत पाहून दि. १ एप्रिलपासून लॅब सुरू करण्याचे निर्देश होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुढाकार घेऊन लॅबसाठी जागा दिली. शासनाने इमारत दुरुस्तीसाठी व फर्निचरसाठी २४ लाखांचा निधी दिला आहे. उर्वरित ११ लाख रुपयेही मिळणार आहेत. ‘फॉरेन्सिक लॅब’चे युद्धपातळीवर सुरू असलेले काम पाहण्यासाठी आपण कोल्हापुरात आल्याचे त्या म्हणाल्या. गोळीबार मैदानाची निवड? ४‘फॉरेन्सिक लॅब’करिता कायमस्वरूपी इमारत बांधण्यासाठी गोळीबार मैदान व केर्ली येथील जागेची निवड केली होती. या दोन्हीही जागांची पाहणी पोलीस महासंचालक बोरवणकर यांनी केली. ४यावेळी उपसंचालक राणा कोकटे यांनी चार जिल्ह्यांसाठी गोळीबार मैदान हीच जागा सोयीस्कर आहे. त्या जागेची आपण शिफारस करावी, अशी विनंती केली. त्याला बोरवणकर यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चार विभाग सुरू फॉरेन्सिक लॅबमध्ये जीवशास्त्र, विषशास्त्र, दारूबंदी, सामान्य विश्लेषण, आदी चार विभाग सुरू करण्यात येणार आहेत. या विभागात यंत्रसामग्री जोडण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण विभागाचे कामकाज उपसंचालक राणा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. त्यासाठी ५४ तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.