शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पैसे देणाऱ्याला नोकरीची मजबुरी

By admin | Updated: November 2, 2014 00:47 IST

‘गुणवत्ता’ याच निकषावर कर्मचारी भरतीची गरज

भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र डोनेशनने पोखरले आहे. भांडवलदारच संस्थाचालक आणि शिक्षक होणार, अशी सध्याची व्यवस्था. डोनेशनचा सर्व व्यवहार चार भिंतींंमधील असतो. पैसे देणाऱ्याला नोकरीची मजबुरी असते. त्यामुळे दहा रुपये देताना विचार करणाराही लाखो रुपये देताना कोणतीही पोहोच, पुरावा घेत नाही. डोनेशन घेता आणि देता येऊ नये; केवळ गुणवत्तेवरच शिक्षकांची नियुक्ती झाली पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजातील शिक्षणतज्ज्ञ, राजकारणातील प्रामाणिक लोकांनी व्यापक प्रमाणात पुढे येण्याची गरज ठळक झाली आहे. जिल्ह्यासह राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये डोनेशन संस्कृती फोफावली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास आहे. महाराजांनी सर्वसामान्यांना व बहुजनांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब, गुणवंत शिक्षकांना शिक्षक होण्याची दार बंद होऊ नयेत म्हणून ठोस काहीतरी करण्याची जबाबदारी या जिल्ह्यावर अधिक आहे. विविध चळवळींच्या माध्यमातून अनेक मग्रुर अधिकारी व राजकारण्यांना वठणीवर आणण्यात यश आले आहे. डोनेशनची प्रवृत्तीही ठेचून काढण्याची सुरुवात जिल्ह्यातून सुरू व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे. शिक्षणाची गुणवत्ता ढासळण्याला डोनेशन संस्कृती हे मुख्य कारण आहे. दर्जा राखण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांचेही प्रचलित राजकीय व्यवस्थेमुळे ‘हात’ बांधले आहेत. यामुळे आता परिवर्तनासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. डोनेशनमुळेच गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांची नेमणूक होत आहे, दर्जा घसरत आहे, हे शासकीय यंत्रणेच्या उशिरा का होईना लक्षात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेत पास झालेल्यांना शिक्षक म्हणून नियुक्त करावे, असे आशादायक बदल होत आहेत. बदलाची गती संथ आहे. बदलाला वेग येऊन शिक्षकभरतीचे संपूर्ण अधिकार संस्थाचालकांकडून काढून घेऊन गुणवत्ता या एकाच निकषावर नियुक्ती झाल्यास डोनेशनच्या प्रवृत्तीला आळा बसणार आहे. या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेक संस्थाचालकांची राजकीय नेत्यांशी सलगी असते. निवडणुकीत हवे तितके फंडिंग केलेले असते. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्या शिक्षणसंस्थाचालकांना पोषक होईल असे धोरण ठरविण्यात संंबंधित लोकप्रतिनिधींचा कल असतो. यामुळे शिक्षक निवडीच्या निकषांच्या बदलात व्यत्यय येत आहे, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. चव्हाट्यावर आणल्यास फरक शक्य डोनेशन प्रवृत्तीची झळ बसलेल्या गरीब, सर्वसामान्य वर्गातील हुशार, गुणवंत उमेदवारांनी रडत बसण्यापेक्षा संघटितपणे संबंधित शिक्षण संस्थांच्या विरोधात विविध माध्यमांतून लढण्याची अचूक वेळ आली आहे. लोकशाही मार्गाचा अवलंब करीत प्रसंगी डोनेशनबहाद्दरांच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रवृत्ती चव्हाट्यावर आणल्यास डोनेशन घेऊन शिक्षक भरती झाली आहे, हे पालकांना जाहीरपणे सांगितल्याचा त्वरित ‘रिझल्ट’ अन्यायग्रस्त अशा आंदोलनकर्त्यांना मिळणार आहे. परिणामी पालकही पाल्याला डोनेशनबहाद्दरांच्या शाळेत दाखल करताना गांभीर्याने विचार करतील. (समाप्त)