शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

खासगी रुग्णालयांना म्युकरवरील उपचारांची सक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, ...

कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांवरील उपचाराची सक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबत प्रशासनानेही पावले उचलत मंगळवारी दुपारी ४ वाजता खासगी रुग्णालयांची बैठक बोलावली आहे.

या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यावर सध्या केवळ सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे सीपीआरवर मोठा ताण येत आहे. शहर-जिल्ह्यातील पाच दवाखाने शासनाने उपचारासाठी जाहीर केले आहे. मात्र, आजवर सीपीआरमध्ये २५ शस्त्रक्रिया तर तीन खासगी दवाखान्यात झाल्या आहेत. ज्या रुग्णालयांना शासकीय योजना लागू आहेत त्यांनीही हात वर केले आहेत. या रुग्णांचे उपचाराच्या व पैशाच्या पातळीवरदेखील हाल होत आहेत. त्यामुळे जे दवाखाने शासकीय योजनांचा लाभ घेतात त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची तातडीने बैठक घेण्यात यावी व त्यांना म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी द्यावी. अन्यथा कायद्याच्या चौकटीत धडा शिकवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले. आज मंगळवारी दुपारी ४ वाजता याबाबत बैठक होणार आहे. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, मंजित माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---

फोटो नं ०७०६२०२१-कोल-शिवसेना बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत शिवसेनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे खासगी रुग्णालयांना म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचाराची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली. यावेळी डॉ. हर्षला वेदक, संजय पवार, शिवाजीराव जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.

---