शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

‘शिवछत्रपती’ पुरस्कारांमध्ये ‘फुटबॉल’ उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:25 IST

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवल्याने फुटबॉल प्रशिक्षकांनी प्रस्तावच सादर केले नाहीत. त्यामुळे यंदाही फुटबॉलपासून हा पुरस्कार दूरच राहिला.राज्य शासनातर्फे दरवर्षी खो-खो, कबड्डी, हँडबॉल, आट्यापाट्या, बास्केटबॉल, ...

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवल्याने फुटबॉल प्रशिक्षकांनी प्रस्तावच सादर केले नाहीत. त्यामुळे यंदाही फुटबॉलपासून हा पुरस्कार दूरच राहिला.राज्य शासनातर्फे दरवर्षी खो-खो, कबड्डी, हँडबॉल, आट्यापाट्या, बास्केटबॉल, क्रिकेट, हॉकी, व्हॉलिबॉल, फुटबॉल, कराटे, कुस्ती अशा खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाºया खेळाडूंचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करते. त्यात खेळाडू घडविणाºया प्रशिक्षक, मार्गदर्शक व संघटकांनाही पुरस्कार देऊन गौरव करते. त्यात सांघिक खेळांमध्ये किमान दहा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले असावेत, असा निकष लावण्यात आला आहे. हा निकष इतर खेळात लागू पडू शकतो. मात्र, फुटबॉल त्याला अपवाद ठरत आहे. एखाद्या प्रशिक्षकाला महाराष्ट्रासारख्या राज्यातून फुटबॉलमधून एक खेळाडू घडविताना किती कष्ट घ्यावे लागतील, याचा विचारच न केलेला बरा. आॅक्टोबर २०१७ मध्ये भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत राज्याचा एकमेव फुटबॉलपटू अनिकेत जाधव भारताकडून खेळला.त्याला घडविण्यात मोलाचा वाटा असलेले पुण्याचे प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल हेही ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे अंगीरवाल हे वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पटकाविलेल्या संतोष ट्रॉफी विजेत्या संघातील खेळाडू आहेत. त्याबरोबरच अनिकेत जाधवसह मोहन बागानकडून खेळणारा निखिल कदम, २३ वर्षांखालील भारतीय संघातील गोलरक्षक सुखदेव पाटील याच्यासह अनेक खेळाडू घडविले आहेत, तरीही क्रीडा खात्याच्या लेखी १० वरिष्ठ गटातील खेळाडू घडविणे गरजेचे आहे. हाच निकष फुटबॉलमध्ये लावल्यास एकाही फुटबॉल प्रशिक्षकास हा पुरस्कार मिळणे कठीण आहे.कोल्हापूर, मुंबईत तंत्रशुद्ध फुटबॉल प्रशिक्षण हवेजगातील २०७ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. कोलकाता, गोवा या शहरानंतर कोल्हापुरातही हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यात रसिकांसह खेळाडूंची खाणही याच कोल्हापुरात आहे, तरीही क्रीडा खात्याच्या क्रीडाप्रबोधिनीत सर्व खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. मात्र, फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नाही. राज्यात सद्य:स्थितीत एकूण १३ क्रीडाप्रबोधिनी आहेत. त्यातील पुणे येथील बालेवाडीमध्येच फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. हीच सोय कोल्हापूर, नागपूर, मुंबई येथे मिळाली तर महाराष्ट्रातून अनेक फुटबॉलपटू देशाला मिळतील. खेळाच्या प्रसारासाठी अशीही अपेक्षा अंगीरवार यांनी बोलून दाखविली.