शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे फूड क्लस्टर नांदणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:19 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांसाठी चळवळ चालविण्याबरोबरच स्वाभिमानी दूध संघापाठोपाठ नांदणी येथे ‘फूड क्लस्टर’ उभारणीच्या ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांसाठी चळवळ चालविण्याबरोबरच स्वाभिमानी दूध संघापाठोपाठ नांदणी येथे ‘फूड क्लस्टर’ उभारणीच्या कामाला खासदार राजू शेट्टी यांनी सुरुवात केली आहे. ३५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, ‘प्रधानमंत्री किसान संपदा’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प आहे.कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी या योजनेतून प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाने ही ‘प्रधानमंत्री किसान संपदा’ योजना सुरू केली आहे. या अंतर्गत खासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी कृषी औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली आहे. यासाठी नांदणी येथील ३० शेतकरी एकत्रित करण्यात आले असून,त्यांच्या नावावरील ३० एकर जमीन बॅँकेला तारण देऊन कर्जउभारणी केली आहे.या ३५ कोटींपैकी पावणेबारा कोटी रुपये संस्थेचे, तितकाच निधी केंद्र शासनाचा आणि तितकाच निधी बॅँकेचा अशा पद्धतीने निधी उभारणी होणार असून, नांदणी येथील जमीन बिगरशेती करण्यासाठी ७० लाख रुपये भरण्यात आले. त्यानंतर बिगरशेती झाल्यानंतर सध्या या ठिकाणी रस्ते करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये डाळ, मसाला, हळद, दूध आणि भात अशा पाच कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग एकत्रितपणे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी शीतगृह, गोदामे अशा सुविधाही उभारण्यात येणार आहेत. शेतकºयांचा कच्चा माल घेऊन तो खरेदी करून नंतर त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.छोटे-छोटे शेतकरी अशा पद्धतीचे प्रकल्प उभारू शकत नाहीत; म्हणून काही शेतकºयांना एकत्र करून त्यांना पाठबळ देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. अशा या योजनेतूनही प्रकल्प उभारणी होत असल्याचे सांगण्यात आले.नियोजन समितीमधून २४ लाख रुपयेनांदणी येथे नियोजित प्रकल्पस्थळी सध्या वीज नाही. ती लांबून आणावी लागणार आहे. यासाठी खांब टाकण्याचा खर्च मोठा होता; परंतु तो नव्या संस्थेवर टाकणे शक्य नसल्याने यासाठी नियोजन समितीमधून निधी मिळावा, असा प्रस्ताव खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पासाठी नियोजन समितीमधून २४ लाख रुपये मंजूर केले असून, मंत्री पाटील यांनीच सोमवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.