महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा येथून भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी असते. त्यांच्या राहण्यासह येथे अन्नछत्राची गरज होती. त्यासाठी देवस्थान समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
या इमारतीसाठी दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, १५ हजार स्क्वे. फूट इतके बांधकाम होणार आहे. वर्षभरात ही इमारत भाविकांच्या सेवेसाठी पूर्ण करणार असल्याचे ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, प्रशांत पत्की,राजेंद्र पाटील, बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, बळीराम मगर, देवाप्पा पुजारी,मोहन पाटील आदी उपस्थित होते.
२३ मतके बाळूमामा भक्तनिवास
कॅप्शन मुळक्षेत्र मतके येथील बाळूमामा मंदिराच्या भक्तनिवास व अन्नछत्र इमारतीचा पायाभरणी शुभारंभ करताना भगवान गिरी महाराज यावेळी कोंडीबा महाराज व ट्रस्टचे पदाधिकारी.
छाया साताप्पा चव्हाण, बेनिक्रे.