शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अध्यासनाद्वारे देशमुखांच्या परिचयाचा नवा अध्याय सुरू

By admin | Updated: October 19, 2016 00:35 IST

एन. डी. पाटील : ‘स्वाभिमानी वीज कामगार’तर्फे दहा लाखांचा निधी

कोल्हापूर : तेजस्वी, अभ्यासू, लढाऊ, धाडसी नेतृत्व असलेल्या कॉ. दत्ता देशमुख यांच्या जीवनकार्याची ओळख, परिचय करून देणाऱ्या नव्या अध्यायाचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठातील त्यांच्या नावाने सुरू होणाऱ्या अध्यासनाद्वारे झाला आहे. देशमुख यांचे कार्य आजच्या नव्या पिढीला आवर्जून सांगण्याचे काम व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे केले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे मुखपत्र ‘स्वाभिमानी वीज कामगार’ पुरस्कृत ‘कॉ. दत्ता देशमुख अध्यासन’ शिवाजी विद्यापीठात सुरू करण्यात येत आहे. या अध्यासनासाठीच्या निधी सुपूर्द कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील गणितशास्त्र विभागाच्या सभागृहात ‘स्वाभिमानी वीज कामगार’तर्फे दहा लाख रुपयांच्या निधीचा धनादेश ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, वर्कर्स फेडरेशनचे प्रभारी अध्यक्ष मोहन शर्मा, विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. डॉ. शिंदे म्हणाले, कॉ. देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. विद्यापीठातील हे अध्यासन त्यांच्या सामाजिक, राजकीय, आदी क्षेत्रांतील कार्याचा अभ्यास करणारे विस्तृत व्यासपीठ होईल. डॉ. चौसाळकर म्हणाले, पुरोगामी चळवळीतील एका कार्यकर्त्याचे देशमुख यांच्या नावाने विद्यापीठात साकारत असलेले हे पहिलेच अध्यासन आहे. शर्मा म्हणाले, कॉ. देशमुख यांच्या कार्याची भावी पिढीला ओळख करून देण्यास व देशमुख यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी हे अध्यासन साकारण्यात येत आहे. के. पी. तांबेकर, प्रा. डॉ. भारती पाटील, आदींसह वीज कामगार उपस्थित होते. ‘स्वाभिमानी वीज कामगार’ मुखपत्राचे संपादक सुरेश परचुरे यांनी स्वागत केले. वीज कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनय कोटी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)लढ्यात गुणात्मक फरकसंयुक्त महाराष्ट्राचा लढा, दुष्काळ निर्मूलन समितीवरील कामकाजात कॉ. देशमुख यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा राहिला. तत्कालीन परिस्थितीत त्यांनी उभारलेला उसाच्या किमतीसाठीचा संघर्ष आणि आजच्या परिस्थितीतील त्याच प्रकारचे लढे यांच्यात अत्यंत गुणात्मक फरक असल्याचे दिसून येत असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.