शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात कमी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:41 IST

कोल्हापूर : प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होईल, त्यासाठी प्रत्येकानेच प्रबोधनात्मक पाऊलही उचलावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक ...

कोल्हापूर : प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होईल, त्यासाठी प्रत्येकानेच प्रबोधनात्मक पाऊलही उचलावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले.

३२ व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाअंतर्गत दि. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ या ब्रिद वाक्याप्रमाणे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या समारोपप्रसंगी प्रशासक बलकवडे या प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होत्या. हा कार्यक्रम ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात बुधवारी झाला.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी वाहतुकीचे नियम, हेल्मेट वापराचे फायदे आदीबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. युवापिढी, विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी शास्त्रोक्त पध्दतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेऊनच वाहने चालवावीत, नियमांचे पालन करावे, याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

अभियानांतर्गत रस्ता सुरक्षासंदर्भात आयोजित शालेय मुला-मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, निबंध, घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस दलातील वाहनचालक, शहर वाहतूक शाखेतील उत्कृष्ट वाहतूक नियमन करणारे अंमलदार, एस. टी. विभाग, के.एम.टी., सार्वजनिक बांधकाम विभागाकडील विनाअपघात वाहन चालविणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात आला.

प्रस्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केले. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी पोलीस, विद्यार्थी, आरएसपी, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

फोटो न. १७०२२०२१-कोल-सत्कार ट्रॅफीक०१,०२

ओळ : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभात परिवहन विभागातील विनाअपघाताबद्दल चालकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते.