शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा

By admin | Updated: August 31, 2015 23:31 IST

पी. शिवशंकर यांचे आवाहन : सार्वजनिक गणेशोत्सव मंडप, ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत मंडळासोबत प्रशासनाची बैठक

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवप्रसंगी उभारण्यात येणारे मंडप आणि ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन सार्वजनिक तरुण मंडळांनी करावे, असे आवाहन कोल्हापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. शहरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप, ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमावलीविषयी माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्थायी सभागृहात सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. पी. शिवशंकर म्हणाले, उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यांचे महापालिका तंतोतंत पालन करणार आहे. यासाठी तहसीलदार करवीर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पाहणी करणार आहे. जी मंडळे या निर्देशांचे पालन करणार नाहीत त्या मंडळांवर पोलीस प्रशासनामार्फत कडक कारवाई केली जाईल. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांनी नियमावली वाचून दाखविली, तर मंडप व्यावसायिक प्रशांत मंडलिक यांनी मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यावरील मंडप उभारणीसाठी नियम एकच आहेत का, अशी विचारणा केली तर सुहास भेंडे यांनी ‘एक खिडकी योजना’ची मागणी केली.शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक एम. बी. साखळे यांनी मंडळांसाठी शहर उपअधीक्षक कार्यालयातर्फे आज, मंगळवारपासून हरकत दाखल्यांसाठी एक खिडकी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. बैठकीस तहसीलदार योगेश खरमाटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, पर्यावरण अभियंता पाटील उपस्थित होते. मंडप उभारणीसाठी जाहीर केलेली आचारसंहिता मंडळाचा मंडप रस्त्याच्या १/४ भागापेक्षा अधिक असू नये२५ फूट रस्त्यासाठी ६.२५ फूट कमाल रूंदी, तर १८.७५ मोकळी जागा असली पाहिजे, तर ५० फुटांसाठी १२.५ फूट रुंदी, मोकळी जागा ३७.५ फूट हवी. ७० फूट रस्त्यासाठी १७.५ फूट रुंद, तर ५२.५ फूट मोकळी जागा हवी. शहर वाहतूक, पोलीस स्टेशन व महापालिका अतिक्रमण विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक.रस्त्याच्या आवश्यकतेनुसार मंडप कमी-जास्त करण्याचा अधिकार महापालिकेकडे अबाधित ठेवला आहे.महापालिकेच्या परवानगीनुसारच मंडप उभारणे बंधनकारक आहे. पालन न केल्यास कडक कारवाई केली जाणार. के.एम.टी. बसमार्गावर १२ फूट रूंद जागा हवी.८ फूट रस्त्यावर मंडप उभारणी करण्यास परवानगी दिली जाणार नाही.मंडळांनी रितसर पैसे भरूनच विद्युत कनेक्शन घ्यावे, महापालिकेच्या खांबावरून कनेक्शन घेतल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई .मंडप उभारताना डीपी बॉक्स, विद्युत तार यांच्यात किमान ६ फूट अंतर हवे. मंडपापासून १५ मीटर अंतरापर्यंत विद्युत रोषणाईस परवानगी.मंडपाच्या आसपास रस्ता पोलिसांच्या परवानगीशिवाय बंद करता येणार नाही.नवीन डांबरीकरण, सिमेंट रस्त्यावर खुदाई करता येणार नाही. लोखंडी फॅब्रिकेशन साच्यांमध्ये मंडप उभारण्यास हरकत नाही. परवानगीशिवाय कमान, शुभेच्छा फलक उभारता येणार नाहीत. अनधिकृत कमानी उभारल्यास मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल केले जाणार. रस्त्यावर मंडप कमीत कमी पाच दिवस, तर जास्तीत जास्त १५ दिवस उभारता येणार.ध्वनिप्रदूषणाबाबतही कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५, तर रात्री ७०, वाणिज्यकमध्ये दिवसा ६५, तर रात्री ५५ आणि निवासी क्षेत्रात दिवसा ५५, तर रात्री ४५ व शांतता क्षेत्रात दिवसा ५०, तर रात्री ४० डेसिबल इतकी आवाजाची तीव्रता हवी. अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे. मंडळांचा बैठकीस अल्प प्रतिसादकोल्हापूर शहरात पाचशेहून अधिक मंडळे असताना या बैठकीस या मंडळापैकी शिवाजी चौक तरुण मंडळ, राधाकृष्ण तरुण मंडळ ट्रस्ट, निर्माण तरुण मंडळ, गोल सर्कल तरुण मंडळ, डांगे गल्ली तरुण मंडळ, तेली गल्ली मित्र मंडळ, मंगेशकर नगर तरुण मंडळाचे प्रतिनिधीच उपस्थित होते.