शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील दुर्मीळ वृक्ष संवर्धनाचा वसा

By admin | Updated: April 23, 2015 00:37 IST

वसुंधरा दिनाचा उपक्रम : ३५० वृक्षांना लावणार फलक; नागरिकांतून करणार जागृती

कोल्हापूर : शहरातील रस्त्याच्या कडेला बागा, शिवाजी विद्यापीठ परिसर, कृषी विद्यापीठ परिसर, शेतवड, आदी ठिकाणी तब्बल ४० दुर्मीळ जातींचे ३५० वृक्ष दुर्लक्षित आहेत. या सर्व दुर्मीळ वृक्षांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड व अनिल चौगुले यांच्या पुढाकारातून बुधवारी ‘वसुंधरा दिना’चे औचित्य साधत फलक लावण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली. यामुळे शहरातील दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनाचा वसा सुरू झाला.लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ शहर कार्यालयाच्या दारात ‘रत्नकुंज’ या जातीचे शहरातील एकमेव झाड आहे. अशा प्रकारचे गोरखचिंच, सीता अशोक, कदंब, हनुमानफळ, टेंभुर्णी, बारतोंडी, सुकाणू, सातवी, जारूळ, टेठू, गोंदणी, चेसनेट, कापूर, अमृतफळ, करंबळी असे अनेक दुर्मीळ वृक्ष दुर्लक्षित आहेत. यातील अनेक वृक्ष शहरात एक किंवा दोनच आहेत. ही झाडे काही कारणांनी तोडली गेल्यास शहरातून त्यांचे अस्तित्वच संपणार आहे.शहरातील दुर्मीळ अशा ४० जातींच्या ३५० वृक्षांचे ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले व विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांनी संवर्धन करण्याचे ठरविले आहे. या वृक्षांना त्यांचे नाव व संरक्षित वृक्ष असा फलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे या वृक्षांचे महत्त्व शहरवासीयांना समजेल. या वृक्षांच्या बिया संकलित करून त्यांचे संवर्धन केले जाईल. अशा वृक्षांची काळजी घेऊन त्यांची वाढ केली पाहिजे, ही भावना शहरवासीयांत रुजेल, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे अनिल चौगुले यांनी स्पष्ट केले. या दुर्मीळ वृक्षांना फलक लावण्याचा तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, टाउन हॉल येथील दुर्मीळ वृक्षांना आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते असा फलक लावून या उपक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)