शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीकेंद्रित, गुणवत्तावाढीवर भर देणार

By admin | Updated: June 17, 2016 00:31 IST

वर्षपूर्तीनिमित्त कुलगुरूंची ग्वाही : गतिमान कामकाज करणार, विद्यापीठातील घटकांमुळेच यशस्वी वाटचाल

कोल्हापूर : संशोधन, कौशल्य, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या स्तंभांवर भविष्यातील शिक्षण आणि रोजगार आधारित असणार आहेत. त्यामुळे यावर भर देत विद्यार्थीकेंद्रित आणि गुणवत्तावाढीच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाची वाटचाल राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.कुलगुरुपदाच्या वर्षपूर्तीबाबत डॉ. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी शैक्षणिक, संशोधन, केंद्र व राज्य सरकारच्या विविध उपक्रमांतील सहभाग, कौशल्य विकास उपक्रम, सामाजिक बांधीलकी, आदी क्षेत्रांतील वर्षभरातील कामगिरीची माहिती दिली. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, संशोधन, कौशल्य, तंत्रज्ञान व व्यवस्थापन या चार स्तंभांच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून काम सुरू केले. त्या दृष्टीने विद्यापीठात विविध घटकांच्या सहकार्याने उपक्रम राबविले. यात बऱ्यापैकी यशस्वी वाटचाल केली आहे. वर्षभरातील कामगिरीत नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, आॅल इंडिया सर्व्हे आॅन हायर एज्युकेशन, नेचर पब्लिकेशन ग्रुपच्या ई-जर्नल वापराच्या सर्व्हेक्षणात अव्वल स्थानी राहून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाची गुणवत्ता सिद्ध केली व वेगळा ठसा उमटविला. यापुढील वाटचालीत विद्यार्थीविकास हा केंद्रबिंदू मानून तसेच गुणवत्ता वाढीसाठी सर्वसमावेशक आणि गतिमान कामकाजावर भर देणार आहे. विद्यापीठाच्या घटकांची निष्ठा, जबाबदारीने केलेल्या कामामुळे मला यशस्वी वर्षपूर्तीची वाटचाल करता आली. पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. डी. के. गायकवाड, आर. के. कामत, पी. एन. भोसले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आधी करेन,मग बोलेनविनाकारण घोषणा करणे मला आवडत नाही; त्यामुळे आधी काम करीन आणि मगच त्याबाबत बोलेन, अशी माझ्या कामाची पद्धत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या विद्यापीठाचा शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध करण्याच्या जबाबदारीने मी कार्यरत राहीन.