शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोषणाईवर भर; डॉल्बीला फाटा

By admin | Updated: September 14, 2016 00:41 IST

पारंपरिक वाद्यांवर तरुणाई थिरकणार : विसर्जन मिरवणुकीत मंडळांची जय्यत तयारी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उद्या, गुरुवारी डॉल्बीमुक्त, प्रदूषणमुक्तचे दाट सावट दिसून येत आहे. पोलिस खात्याने डॉल्बीवर निर्बंध आणल्याने गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांची पावले पारंपरिक वाद्यांवर थिरकणार आहेत. डॉल्बीला फाटा दिल्याने अत्याधुनिक विद्युत रोषणाई, लेझर शोवर मंडळांकडून अधिक भर देत मिरवणुकीवर वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. चित्ररथ, एकाच रंगाच्या गणवेशातील कार्यकर्ते, महिलांचा अधिक सहभाग, आदी नावीन्यपूर्ण उपक्रमातून मिरवणुकीत लक्ष वेधले जाणार आहे. यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.प्रतिवर्षी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती, अत्याधुनिक लाईट इफेक्टवर आणि गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई अक्षरश: बेधुंद होऊन नाचत राहते. डॉल्बी लावण्यासाठी मुख्य मिरवणूक मार्गावर मंडळांमध्ये जणू स्पर्धाच सुरू असते. त्यातून दोन मंडळांना वादाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मिरवणूक २४ ते २५ तास चालते. यंदा मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा घातल्याने मिरवणुकीत वर्चस्व दाखविणाऱ्या मंडळांच्या दिखाऊपणावर मर्यादा आल्या. ‘तुकाराम माळी’चा क्रीडा चित्ररथविसर्जन मिरवणुकीत ‘प्रथम मानाचा गणपती’ म्हणून मान मिळविणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाने यंदा मिरवणुकीत ‘महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरा’चा चित्ररथ सहभागी करून लक्ष वेधणार आहे. कुस्तीसह विविध खेळांचे तसेच आॅलिम्पिकमध्ये पदके मिळविलेल्या खेळाडूंचे, कोल्हापुरातील गाजलेल्या मल्लांचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. सुमारे १५० हून अधिक महिला हिरव्या साड्या व पुरुष कार्यकर्ते पांढऱ्या गणवेशात मिरवणुकीत सहभागी होत आहेत. ‘पाटाकडील’चा पारंपरिक वाद्यांचा बाजमिरवणुकीत प्रतिवर्षी छाप पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाकडून यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्यांची मोहर मिरवणुकीवर उमटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाशिकच्या ढोल-ताशासह काही पारंपरिक वाद्यांचा सहभाग तसेच त्याला गोव्यातील अत्याधुनिक विद्युत रोषणाईची साथ दिली जाणार आहे.‘दयावान’चा वॉटर शोशिवाजी पेठेतील दयावान गु्रपचा वॉटर स्क्रीन शो लक्षवेधी ठरणार आहे. याशिवाय अत्याधुनिक विद्युत रोषणाई, मल्टी लेसर शो, डबल एलईडी स्क्रीन, हवेतील बबल्सचे नावीन्यपूर्ण आणि नियमानुसार ध्वनियंत्रणा राहणार आहे. ‘तटाकडील’चे आसामी नृत्यप्रतिवर्षी मिरवणुकीत उत्सुकता निर्माण करणाऱ्या तटाकडील तालीम मंडळातर्फे यंदा मिरवणुकीत आसाम राज्यातील गुवाहाटी येथील ‘सन्मान्य क्षेत्र’ या कलामंचाचे पारंपरिक नृत्य सादर केले जाणार आहे. हे नृत्य मिरवणुकीत आकर्षण ठरणार आहे. या पथकात ३० कलाकार व ५० वादक असे पथक सहभागी होत आहे. याशिवाय मर्दानी खेळ, लेझीम व पारंपरिक बॅँड सहभागी होत आहे. ‘फिरंगाई’चा लेसर शोफिरंगाई तालीम मंडळ विसर्जन मिरवणुकीत अत्याधुनिक विद्युत रोषणाई व लेसर शोद्वारे लक्ष वेधणार आहे. याशिवाय नियमांत राहून ध्वनियंत्रणेचा वापर केला जाणार आहे. तसेच मुंबईच्या धर्तीवर गणेशमूर्तीभोवती आकर्षक सजावट केली जाणार आहे.‘लेटेस्ट’चा ‘गंगावतरण’चा चित्ररथगंगा नदी ते पंचगंगा नदीमातेची विटंबना थांबण्यासाठी व जनजागृतीसाठी ‘गंगावतरणा’चा लेटेस्ट तरुण मंडळाचा चित्ररथ लक्षवेधी ठरणार आहे. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून नेहमीच या मंडळाकडे पाहिले जाते. चित्ररथात १३ फूट उंच शंकरमूर्ती, नदी व प्रत्येकी सहा फुटांच्या अकरा मूर्ती आहेत. पांढऱ्या रंगाच्या गणवेशातील सुमारे ३६० महिला व पुरुष कार्यकर्ते फेटा बांधून सहभागी होत आहेत. तसेच झांजपथक व धनगरी ढोल, आदी वाद्यांची साथ राहणार आहे.