शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोषणाईवर भर; डॉल्बीला फाटा

By admin | Updated: September 14, 2016 01:19 IST

पारंपरिक वाद्यांवर तरुणाई थिरकणार : विसर्जन मिरवणुकीत मंडळांची जय्यत तयारी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उद्या, गुरुवारी डॉल्बीमुक्त, प्रदूषणमुक्तचे दाट सावट दिसून येत आहे. पोलिस खात्याने डॉल्बीवर निर्बंध आणल्याने गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांची पावले पारंपरिक वाद्यांवर थिरकणार आहेत. डॉल्बीला फाटा दिल्याने अत्याधुनिक विद्युत रोषणाई, लेझर शोवर मंडळांकडून अधिक भर देत मिरवणुकीवर वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. चित्ररथ, एकाच रंगाच्या गणवेशातील कार्यकर्ते, महिलांचा अधिक सहभाग, आदी नावीन्यपूर्ण उपक्रमातून मिरवणुकीत लक्ष वेधले जाणार आहे. यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.प्रतिवर्षी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती, अत्याधुनिक लाईट इफेक्टवर आणि गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई अक्षरश: बेधुंद होऊन नाचत राहते. डॉल्बी लावण्यासाठी मुख्य मिरवणूक मार्गावर मंडळांमध्ये जणू स्पर्धाच सुरू असते. त्यातून दोन मंडळांना वादाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मिरवणूक २४ ते २५ तास चालते. यंदा मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा घातल्याने मिरवणुकीत वर्चस्व दाखविणाऱ्या मंडळांच्या दिखाऊपणावर मर्यादा आल्या. ‘तुकाराम माळी’चा क्रीडा चित्ररथविसर्जन मिरवणुकीत ‘प्रथम मानाचा गणपती’ म्हणून मान मिळविणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाने यंदा मिरवणुकीत ‘महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरा’चा चित्ररथ सहभागी करून लक्ष वेधणार आहे. कुस्तीसह विविध खेळांचे तसेच आॅलिम्पिकमध्ये पदके मिळविलेल्या खेळाडूंचे, कोल्हापुरातील गाजलेल्या मल्लांचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. सुमारे १५० हून अधिक महिला हिरव्या साड्या व पुरुष कार्यकर्ते पांढऱ्या गणवेशात मिरवणुकीत सहभागी होत आहेत. ‘पाटाकडील’चा पारंपरिक वाद्यांचा बाजमिरवणुकीत प्रतिवर्षी छाप पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाकडून यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्यांची मोहर मिरवणुकीवर उमटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाशिकच्या ढोल-ताशासह काही पारंपरिक वाद्यांचा सहभाग तसेच त्याला गोव्यातील अत्याधुनिक विद्युत रोषणाईची साथ दिली जाणार आहे.‘दयावान’चा वॉटर शोशिवाजी पेठेतील दयावान गु्रपचा वॉटर स्क्रीन शो लक्षवेधी ठरणार आहे. याशिवाय अत्याधुनिक विद्युत रोषणाई, मल्टी लेसर शो, डबल एलईडी स्क्रीन, हवेतील बबल्सचे नावीन्यपूर्ण आणि नियमानुसार ध्वनियंत्रणा राहणार आहे. ‘तटाकडील’चे आसामी नृत्यप्रतिवर्षी मिरवणुकीत उत्सुकता निर्माण करणाऱ्या तटाकडील तालीम मंडळातर्फे यंदा मिरवणुकीत आसाम राज्यातील गुवाहाटी येथील ‘सन्मान्य क्षेत्र’ या कलामंचाचे पारंपरिक नृत्य सादर केले जाणार आहे. हे नृत्य मिरवणुकीत आकर्षण ठरणार आहे. या पथकात ३० कलाकार व ५० वादक असे पथक सहभागी होत आहे. याशिवाय मर्दानी खेळ, लेझीम व पारंपरिक बॅँड सहभागी होत आहे. ‘फिरंगाई’चा लेसर शोफिरंगाई तालीम मंडळ विसर्जन मिरवणुकीत अत्याधुनिक विद्युत रोषणाई व लेसर शोद्वारे लक्ष वेधणार आहे. याशिवाय नियमांत राहून ध्वनियंत्रणेचा वापर केला जाणार आहे. तसेच मुंबईच्या धर्तीवर गणेशमूर्तीभोवती आकर्षक सजावट केली जाणार आहे.‘लेटेस्ट’चा ‘गंगावतरण’चा चित्ररथगंगा नदी ते पंचगंगा नदीमातेची विटंबना थांबण्यासाठी व जनजागृतीसाठी ‘गंगावतरणा’चा लेटेस्ट तरुण मंडळाचा चित्ररथ लक्षवेधी ठरणार आहे. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून नेहमीच या मंडळाकडे पाहिले जाते. चित्ररथात १३ फूट उंच शंकरमूर्ती, नदी व प्रत्येकी सहा फुटांच्या अकरा मूर्ती आहेत. पांढऱ्या रंगाच्या गणवेशातील सुमारे ३६० महिला व पुरुष कार्यकर्ते फेटा बांधून सहभागी होत आहेत. तसेच झांजपथक व धनगरी ढोल, आदी वाद्यांची साथ राहणार आहे.‘वाघाच्या तालीम’ची दुबई फेस्टिव्हलची विद्युत रोषणाईउत्तरेश्वर पेठ प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्यावतीने दुबई फेस्टिव्हलसाठी वापरलेली एल ५ ही अत्याधुनिक एलईडी, शार्पी मल्टिकलर, ब्लेंडर, लेसर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ‘सिओटू स्मूकर’ (धूर) व नियमानुसार २ टॉप व २ बेस अशी साऊंड सिस्टीम साऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे.‘हिंदवी’ची एलईडी स्क्रीनहिंदवी स्पोर्टसतर्फे मिरवणुकीत पुण्याची अत्याधुनिक विद्युत रोषणाई, १२ बाय २२ फूट एलईडी स्क्रीन, लेझर शो याशिवाय ‘सीओटू’ धूर मशीन्स व पारंपरिक वाद्यांचा सहभाग करून लक्ष वेधले जाणार आहे. नियमांच्या अधीन राहून ध्वनियंत्रणेवर नृत्यासाठी युवकांची ताकद एकवटली जाणार आहे. पडद्यावर आॅलिम्पिक विजेत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.