शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य बसस्थानकावर चक्का जाम

By admin | Updated: August 30, 2016 00:09 IST

स्वाभिमान रिक्षा संघटनेचे आंदोलन : बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्याचे आश्वासन

कोल्हापूर : शहरात वाढलेली बेकायदेशीर वाहतूक, तसेच रिक्षांचा ‘बुलाव डाव’ संदर्भात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी स्वाभिमान रिक्षाचालक - मालक संघटनेने मध्यवर्ती बसस्थानक चौकात रस्त्यावर आडव्या रिक्षा उभ्या करून चक्का जाम आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आरटीओच्या खात्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक निरीक्षक अमित गुरव यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारून या बेकायदेशीर वाहतुकीवर आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.कोल्हापूर शहरात वाढलेली बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, अ‍ॅपे रिक्षा, सहा सिटर रिक्षा, बुलाव डाव यासंदर्भात पोलिस खाते, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊनही संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अधिकृत रिक्षा थांबा असताना काही रिक्षाचालक या स्टॉपबाहेर रिक्षा लावून नंबरातील गाडीच्या चालकांना दमदाटी करून त्यांचे प्रवासी घेऊन जातात. त्यामुळे थांब्यावरील नंबरातील रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात कारवाई होत नसल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर व रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे यांनी सांगितले. सुमारे अर्धा तास चक्का जाम आंदोलन केल्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. परंतु, आंदोलन मागे घेण्यात आले नाही. अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अमित गुरव हे घटनास्थळी आले. त्यांनी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर आठवड्यात नियोजन करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद वडगावकर, महेश जाधव, मधुकर दिंडे, अमोल पांढरे, सुनील कांबळे, अनिल लांबोरे, बाळू सदिगले, महादेव गायकवाड, शिवाजी पुजारी, भगवान गायकवाड, आदी रिक्षा व्यावसायिक आपल्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)वाहतुकीची कोंडीनेहमी वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक चक्का जाम आंदोलनामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली. यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक बस गाड्या स्थानकातच थांबून राहिल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होण्यास किमान तासभर लागला.