शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीतच राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच ...

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच जनावरांनाही चारा छावण्यांमध्ये ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला भेट दिल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांची आस्थेने चौकशी केली.

पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या-दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करूया, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला, तसेच १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी येथेच राहावे. आपल्या राहण्याची, जेवणाची आणि जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली जाईल, ‘गोकुळ’च्यावतीने पशुखाद्य दिले जाईल. गुरुदत्त कारखान्याप्रमाणेच दत्त, जवाहर, शरद साखर कारखान्यांचे चेअरमन यांनाही जनावरांना चारा पुरवण्यासाठी विनंती करू, असे सांगितले.

यावेळी पूरग्रस्तांनी प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद देत कारखाना छावणीत नाष्टा, जेवणाची चांगली सोय केल्याचेही आवर्जून सांगितले. गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १५०० पूरग्रस्त व त्यांच्या ८०० जनावरांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पूरग्रस्तांना दोन वेळचा नाष्टा, जेवण, तसेच सर्व जनावरांना चारा दिला जात आहे. यापूर्वीच्या २००५ व २०१९ मधील महापुरात देखील कारखान्याने छावणी उभारून मदत केल्याची माहिती यावेळी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी दिली. दरम्यान, मंत्री पाटील यांनी घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, अकिवाट या भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी, तसेच कन्या शाळा व कारखान्यावरील चारा छावणीला भेट देऊन पाहणी केली.

सध्या मदतकार्यावर भर, पूर ओसरल्यावर नुकसानीचे पंचनामे

यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना वेळेत चहा, नाष्टा, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशुवैद्यकीय सेवा दिली जातेय का, याची विचारणा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन आपल्या सोबत आहे. सध्या मदतकार्यावर भर आहे. पूर ओसरल्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

---

गुुरुदत्त पाहणी

ओळ : पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीत स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भेटून त्यांची आस्थेने चौकशी केली.

----