शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी शनिवारी केले. पुरामुळे बाधित झालेल्या करवीर तालुक्यातील छोटे गॅरेज, उद्योग व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक, इतर पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच मयत व वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पथकांकडून केले जात आहेत. या पथकाला आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास पंचनामे वेळेत पूर्ण होऊन शासनाकडून दिली जाणारी मदत व अनुदान लवकरात लवकर मिळेल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---

ही कागदपत्रे तयार ठेवा

- रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स, घरठाण पत्रक, ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड.

---

पंचनाम्यासाठी येथे संपर्क साधा

१ ) सानुग्रह, निर्वाह भत्त्याचे अनुदान, घराची, गोठ्याची पडझड, व्यावसायिक - शहर : कोल्हापूर मनपा, करवीर : कसबा बावडा, जाधववाडी : उचगाव तलाठी कार्यालय.

ग्रामीण भागात : गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, घर/ गोठा पडझडीसाठी बांधकाम विभाग पंचायत समिती करवीर,

२) कृषी- शहर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच करवीर, कसबा बावडा, जाधववाडी उंचगाव कृषी सहायक व तलाठी कार्यालय.

ग्रामीण भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर तसेच संबंधित गावचे कृषी सहायक कार्यालय व तलाठी कार्यालय

३) पशुधन- शहरी भाग व ग्रामीण भाग : पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती करवीर, गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय.

---