शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनची महापुरात तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST

कोल्हापूर : महापुराच्या धोकादायक स्थितीत सलग आठवडाभरात महापालिकेचा अग्निशमन विभाग २४ तास कार्यकर्तव्यासाठी ‘अलर्ट’ ठेवला होता. त्यानुसार तत्परता दाखवत ...

कोल्हापूर : महापुराच्या धोकादायक स्थितीत सलग आठवडाभरात महापालिकेचा अग्निशमन विभाग २४ तास कार्यकर्तव्यासाठी ‘अलर्ट’ ठेवला होता. त्यानुसार तत्परता दाखवत महापुराचा फटका बसला असतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे ४ हजार १०० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. यासाठी विभागाची ४ दक्षता पथके, १००हून अधिक जवान व स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते यांनी अहोरात्र रेस्क्यू ऑपरेशन राबविले.

आपत्कालीन स्थिती उद्भवण्यापूर्वी दि. १७ जुलैपासून अग्निशमन विभागाने दक्ष राहात यंत्रणा तैनात केली. ताराराणी फायर स्टेशन नं. ९ येथून ही पथके २४ तास अलर्ट होती. हवामानाच्या मिळालेल्या माहितीनुसार, पुराचे पाणी येत असलेल्या भागात बुलेट, जीप, फायर फायटरच्या माध्यमातून प्रथम ध्वनीक्षेपकावरुन सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दि. २२ जुलै रोजी पावसाने रामानंद नगर येथे घरांमध्ये पाणी शिरले, तेथे तत्काळ बोट व पथकांच्या मदतीने १०० नागरिकांना बाहेर काढून जरग नगर शाळेत स्थलांतरित केले. दुसऱ्या दिवशी (दि. २३ जुलै) पावसाचा जोर वाढला, त्यानंतर दि. २६ जुलैपर्यंत महापुरात अग्निशमन विभागाने बोटी, फायर रिंग, लाईफ जॅकेट्सच्या सहाय्याने रमणमळा, लाईन बझार, सिध्दार्थ नगर, शाहुपूरी, कुंभार गल्ली, सुतारवाडा, पंचगंगा हॉस्पिटल परिसर, मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा, यशोदा पार्क, जाधववाडी, बापट कॅम्प, जावडेकर बिल्डींग, हरिपूजा पूरम नगर, विंग्स हॉस्पिटल परिसर, दुधाळी, डायमंड हॉस्पिटल आदी ठिकाणाहून हॉस्पिटलमधील रुग्ण व रहिवासी इमारतीमधील ४ हजार नागरिकांना महापुरातून रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढले. घरी राहिलेल्यांना जवानांनी बोटीद्वारे जाऊन अन्नपाणी, दूध, बिस्कीटे, औषधे दिली.

अग्निशमन विभागाने रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग, स्नेक स्टिक, ॲनिमल कॅचेर, कटर मशीन व रेस्क्यू व्हॅन इत्यादी साहित्याचा वापर करुन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. पूर ओसरु लागल्यानंतर रोगराई पसरु नये म्हणून पूरबाधित भागातील रस्ते फायर फायटरच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन साफ केले.

कोविड रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावून काढले बाहेर

कोविड रुग्णालयातील २२ रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व मास्क लावून बोटीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. पूरक्षेत्रातील इतरही हॉस्पिटलमधील किमान १५० रुग्णांनाही बाहेर काढले. साप, श्वान, मांजर अशा प्राण्यांनाही पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.

अग्निशमन दलाची यंत्रणा...

- रेस्क्यू दिवस : ०७

- दक्षता पथके : ०४

- वाहने : ०७

- जवान : १००

फोटो नं. ३१०७२०२१-कोल-फायर०१

ओळ : महापुरात शहरामध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्परता दाखवत अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.