गणपती कोळी - कुरुंदवाड , ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात कुरुंदवाडच्या गणेश माळी व ओंकार ओतारीने कांस्यपदक जिंकून कुरुंदवाडचे नाव सातासमुद्रापार केले आहे. या स्पर्धेसाठी या शहरातून तिघांची निवड झाली असून, उद्या (मंगळवार) रात्री महेश उर्फ चंद्रकांत माळी हा आपले कौशल्य पणाला लावणार आहे. गतवेळचा तो कांस्यपदक विजेता असून, आता तो सुवर्णपदक मिळविणार, असा आत्मविश्वास शहरवासीयांना आहे. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुरुंदवाडच्या सुपुत्रांची हॅट्ट्रिक पाहण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. २५ हजार लोकवस्तीचे कुरुंदवाड हे निमशहर आहे. खेळाची कोणतीही अत्याधुनिक साधणे, प्रशिक्षण केंद्र नसतानाही कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वास याच्या जोरावर या शहरातील अनेक मुले खो-खो, कबड्डी अशा भारतीय खेळांत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या जोडीला वेटलिफ्टिंग आला असून, यातील यशाने राष्ट्रकुलमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. शहरातील मुलांना व्यायामाची आवड लागावी, शरीर तंदुरूस्त रहावे व व्यसनापासून लांब रहावे या उद्देशाने १९७८ साली प्रदीप पाटील, कुरुंदवाड अर्बन बॅँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, मोनाप्पा चौगुले, आदींनी छोट्याशा खोलीत हर्क्युलस जीम सुरू केली. या जीममधील साधने, जागेवरून अनेकदा संकटे आली. मात्र, व्यायामशाळा सुरू ठेवण्याचा प्रदीप पाटील व सहकाऱ्यांनी चंग बांधला. व्यायामाबरोबर वेटलिफ्टिंगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याचा निश्चिय केला. विद्यार्थ्यांपासून तरुणांचा ओढाही या व्यायामशाळेला लागल्याने जीमचालकांचा उत्साह दुणावला. ग्लासगो येथे चालू असलेल्या या क्रीडा प्रकारात संपूर्ण देशातून विविध वयोगटातून एकूण ८ खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे कुरुंदवाडमधीलच ३ खेळाडू आहेत. यापैकी गणेश माळी व ओंकार ओतारी यांनी आपले कौशल्य पणाला लावून पदक मिळविले आहेत. ६९ किलो वजनी गटासाठी चंद्रकांत माळीचा उद्या (मंगळवारी) रात्री मुकाबला होणार आहे. गतवेळचा तो कांस्यपदक विजेता असल्याने हॅट्ट्रिक साधण्याचा विश्वास असल्याने मंगळवारची रात्र शहरवासीयांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. थेट प्रक्षेपण मंगळवारी मध्यरात्री होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत चंद्रकांत माळीचा खेळ सर्व शहरवासीयांना बघता यावा यासाठी येथील विठ्ठल मंदिर चौकात चंद्रकांतचे काका
राष्ट्रकुलमध्ये फडकला कुरुंदवाडचा झेंडा
By admin | Updated: July 28, 2014 23:18 IST