शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नियमांची पायमल्ली केल्याने कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:41 IST

सुप्रीम कोर्टात याचिका; कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सांगली : शासकीय यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा भंग केल्यानेच सांगली, कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर बनून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. या प्रकरणी कारवाई करताना योग्य निर्देश न्यायालयामार्फत देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल पवार व अ‍ॅड. सचिन पाटील यांनी दिली.

पवार म्हणाले, केंद्रीय आपत्ती निवारण नियम २०१६ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा भंग संबंधित शासकीय यंत्रणांनी केल्याचे दिसून येत आहे. यासाठीच महापुरासंदर्भात सर्व गोष्टींची अभ्यासपूर्वक माहिती घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

केंद्रीय जलआयोगाच्या नियमानुसार पाऊस सुरू होण्याअगोदर धरणात जूनमध्ये १० टक्के, जुलैच्या शेवटी ५० टक्के, आॅगस्टमध्ये ७५ टक्के व १५ सप्टेंबरपर्यंत १00 टक्के पाणीसाठा करून घेण्याबाबत अत्यंत स्पष्ट शब्दात सूचना व नियम दिलेले आहेत. हे नियम या वर्षी कोयना, वारणा व अलमट्टी या धरणांत कुठेही पाळले गेले नाहीत. कर्नाटक व महाराष्ट्रात पराकोटीचा समन्वयाचा अभाव दिसला. वेळेत निर्णय घेऊ न शकल्याने महापुराची तीव्रता वाढत गेली. पलूस तालुक्यात २४ गावांत पूर असताना, पहिल्या तीन दिवसांमध्ये फक्त १२ बोटी होत्या व सांगलीमध्ये ६0 हजार लोकांसाठी फक्त पाच यांत्रिक बोटी व काहीच लाईफ जॅकेट्स होती. सर्वत्र अतिवृष्टी होत असताना व धरणातून पाणी सोडले जात असताना तुटपुंज्या साहित्याच्या आधारे पूरनियोजन केले. बचाव कार्यात स्थानिक प्रशासन अत्यंत तोकडे पडले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.दुष्काळी भागात पाणी सोडायला हवेअर्धा सांगली जिल्हा पाण्यात बुडालेला असताना अर्धा जिल्हा कोरडा ठणठणीत होता. पूरपरिस्थिती असताना, कृष्णा खोºयात टेंभू, ताकारी व म्हैसाळ यांसारख्या योजना पूर्ण क्षमतेने चालू करून दुष्काळी पट्ट्यातील जनतेला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे पवार म्हणाले.निर्देश देण्याची मागणीभविष्यात मानवनिर्मित संकट उभे राहू नये, म्हणून आपत्तीचे सुसूत्र व योग्य नियोजन व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट व कडक नियमावली करून ती लागू करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी न्यायालयात करणार असल्याचे पवार म्हणाले.