शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विमान उड्डाण परवान्याचा प्रश्न मार्गी लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:09 IST

कोल्हापूर : येथील विमानतळावरील उड्डाण परवान्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हा परवाना मिळण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्याला आज, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. परवाना देण्याच्या अनुषंगाने एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया (एएआय) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी या विमानतळाची दोन दिवस पाहणी करणार आहेत. हे अधिकारी मंगळवारी सायंकाळी ...

ठळक मुद्दे विमानतळाची आजपासून पाहणी एएआय, डीजीसीएचे अधिकारी कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : येथील विमानतळावरील उड्डाण परवान्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हा परवाना मिळण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्याला आज, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. परवाना देण्याच्या अनुषंगाने एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया (एएआय) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी या विमानतळाची दोन दिवस पाहणी करणार आहेत. हे अधिकारी मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्याने येथील विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला; पण विमान उड्डाणाच्या परवान्याचे नूतनीकरण, मुंबईतील टाईम स्लॉट, आदी मुद्दे अडथळा ठरले. हे अडथळे दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईतील टाईम स्लॉटचा प्रश्न पालकमंत्री पाटील यांनी सोडविला आहे. खासदार महाडिक यांचा विमान उड्डाण परवाना नूतनीकरणासाठी डीजीसीएच्या संचालकांकडे पाठपुरावा केला.

याअंतर्गत एएआयचे एस. बालन, कृष्णाकुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, पूजा मूल, राजेश अय्यर आणि डीजीसीएचे सुवरिता सक्सेना, मुकेश वर्मा हे कोल्हापूर विमानतळाची आज, बुधवारी आणि गुरुवारी पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर परवाना मिळणे, विमान सेवा सुरू होण्याच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे. 

कोल्हापूर विमानतळाचा उड्डाण परवाना सन २०११ पासून मिळालेला नाही. विमान सेवा सुरू होण्यातील हा एक मोठा अडथळा होता. हा परवाना मिळण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परवाना मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एएआय, डीजीसीएच्या अधिकाºयांनी पाहणी केल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर लवकरच संंबंधित परवाना मिळेल. मुंबईतील टाईम स्लॉटचा प्रश्न सुटला. परवाना मिळाल्यानंतर केवळ विमान सेवा पुरविणाºया कंपनीचा मुद्दा राहणार आहे. हा मुद्दा सोडविण्यासाठी मी आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील एकत्रित प्रयत्न करणार आहे. - खासदार धनंजय महाडिक