शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी उद्या उडणार झुंबड

By admin | Updated: October 12, 2015 00:25 IST

महापालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी जादा टेबलांची व्यवस्था

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत पक्षीय पातळीवर उमेदवारी जाहीर झाल्या असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. ८१ प्रभागांतून सुमारे ११३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज, सोमवारी सर्वपित्री दर्श अमावास्या असल्याने काही मोजकेच उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे तर उद्या, मंगळवारी अंतिम दिवशी घटस्थापनेचा शुभमुहूर्त साधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेच्या सात क्षेत्रीय कार्यालयांत अर्ज स्वीकारण्यासाठी जादा टेबलांची व्यवस्थाकरण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयाच्या आवारात असणाऱ्यांनाच अर्ज दाखल करता येणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-ताराराणी, शिवसेना या प्रमुख चार आघाड्यांनी सर्वच्या सर्व ८१ प्रभागांत उमेदवार उभे करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी बहुतांशी प्रभागांत उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय भाकप, शेकाप, हिंदू आघाडी, एस फोर ए टायगर्स, राष्ट्रीय समाज पक्ष यांनीही काही जागांवर उमेदवारी जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ११६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आॅनलाईनवर उमेदवारी अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता निवडणूक आयोगाने आॅफलाईन (पारंपरिक) पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारची परवानगी दिली होती. त्यानंतर सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत अर्ज भरताना होणारी गर्दी विचारात घेता दोन दिवस अगोदरच शनिवारी अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला. आता आज, सोमवारी सर्वपित्री दर्श अमावास्या असल्याने या दिवशी काही मोजकेच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे तर मंगळवारी (१३ आॅक्टोबर) अंतिम दिवशी उमेदवारी भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. या पार्श्वभूमीवर सातही क्षेत्रीय कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे तसेच मंगळवारीच सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे खिडकीतून उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयाच्या आवारात उपस्थित असणाऱ्या सर्वच उमेदवारांना कार्यालयात एकत्रित घेण्यात येणार आहे पण त्यांच्यासोबत आलेल्या सूचक, अनुमोदकांसह इतर कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेरच थांबावे लागणार आहे. दुपारी तीन वाजल्यानंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज कमी पडू नयेत म्हणून सात निवडणूक कार्यालयांत एकूण सहा हजार अर्ज छापून पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभर उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक निवडणूक कार्यालयांत कर्मचाऱ्यांची संख्या तसेच नेहमीपेक्षा जादा टेबलांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना कार्यालयात घेतल्यानंतर सर्व उमेदवारांचे अर्ज जमा करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारांची शुभमुहूर्त साधण्यासाठी झुंबड उडणार आहे. पोलीस बंदोबस्तही वाढशेवटच्या दिवशी सातही निवडणूक कार्यालयांत एकाच प्रभागातील दोन उमेदवार समोरासमोर येऊन वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता असते. तसेच अर्ज भरताना वेळेचे बंधन असल्याने होणारी गर्दी विचारात घेऊन कोणताही अनुचित प्रसंग उद्भवू नये म्हणून पोलीस यंत्रणेत नेहमीपेक्षा वाढ करण्यात येणार आहे. ‘नो व्हेईकल झोन’गेले आठ दिवस महापालिकेच्या क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना कार्यालयाच्या आवारात आणि बाहेर दुचाकींसह चारचाकी वाहनांचे ताफे उभारल्याने मोठी गर्दी होत होती. त्यामुळे आज, सोमवारपासून निवडणूक कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरच दुचाकींसह सर्व वाहने पार्किंग करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांना निवडणूक कार्यालयापासून १०० मीटर दूरवरच वाहने उभी करावी लागणार आहेत. याशिवाय या आवारात वाहने आढळल्यास त्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.