शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजस्तंभाचे १ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

By admin | Updated: April 8, 2017 00:52 IST

एम. बी. तांबडे; पोलिस निधीसाठी अक्षयकुमार, मराठी अभिनेत्रींची उपस्थिती

कोल्हापूर : येथील पोलिस मुख्यालय परिसरातील पोलिस उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत आहे. दि. १ मे रोजी ध्वजस्तंभाचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याच दिवशी पोलिस मुख्यालय मैदानावर पोलिस कल्याण निधीसाठी ‘मराठी तारका’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यासाठी सिनेस्टार अक्षयकुमार, दहा मराठी सिनेअभिनेत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व नांगरे-पाटील यांच्या पुढाकारातून स्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. उद्यान व ध्वजस्तंभासाठी सुमारे एक कोटी निधीची तरतूद केली आहे. या ध्वजस्तंभाचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन दि. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी पोलिस कवायत मैदानावर पोलिस कल्याण निधी संंकलनासाठी ‘मराठी तारका’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यातून पोलिस कल्याण निधी जमा केला जाणार असून पाचशे ते एक हजार रुपये तिकीट दर आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सिनेस्टार अक्षयकुमार, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, आदी दहा अभिनेत्री, गायक, उपस्थित राहणार आहेत. निधी संकलित करताना सक्ती नको, अवैध व्यावसायिकांना तिकीट विक्री करायची नाही, अशा सूचना केल्याचे तांबडे यांनी सांगितले. यावेळी गृहपोलिस उपअधीक्षक सतीश माने, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, अरविंद चौधरी उपस्थित होते.असा असेल स्तंभउद्यानातील प्रशस्त जागेत हा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. शहराच्या कोणत्याही भागातून या स्तंभावर फडकणारा तिरंगा दिसेल. उद्यानात व्यासपीठाच्या मागील बाजूस तिरंगी ध्वजाच्या रंगांचे महत्त्व विशद करणारी भित्तिचित्रे (म्युरल्स) उभारण्यात येणार असून, त्यावरून पाणी सोडण्यात येणार आहे. तिथे वाहतूक प्रशिक्षण, शस्त्रे व पोशाख प्रदर्शन, आदींचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. ५५ लाखांचा निधी कोल्हापूर पोलिस दलाकडे एक रुपयाही पोलिस निधी नाही. पुणे ग्रामीण पोलिस दलाकडे पाच कोटी, तर शेजारील सांगली पोलिसांकडे एक कोटीचा पोलिस कल्याण निधी शिल्लक आहे. कोल्हापुरात होणाऱ्या ‘मराठी तारका’ कार्यक्रमाचा अंदाज घेत विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी पुणे ग्रामीणकडून ५५ लाखांचा निधी कोल्हापूर पोलिस दलाकडे वर्ग केला आहे.