शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बंदोबस्तासाठी साडेपाच हजार पोलिसांचा ताफा

By admin | Updated: October 12, 2014 01:06 IST

जिल्ह्यात १२९ संवेदनशील मतदारसंघ; अहमदाबाद, लखनौ, भोपाळ, गुजरात येथून राज्य राखीव दलाचे जवान दाखल

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी (दि. १५) होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वत्र नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात १२९ संवेदनशील मतदारसंघ आहेत. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी बाहेरून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली असून, सुमारे साडेपाच हजार पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. अहमदाबाद, लखनौ, भोपाळ, पश्चिम बंगाल, गुजरात येथून राज्य राखीव दलाचे सुमारे दोन हजार पोलीस काल, शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले. सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले.इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी राज्य राखीव दलाच्या दोन-दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. शहरातील शिरोली, तावडे हॉटेल, कावळा नाका, शाहू नाका, शिवाजी पूल, शिये, कसबा बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, फुलेवाडी, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, आदी ठिकाणी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक नाक्यावर व चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत आहे. या संपूर्ण तपासणीचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. साध्या वेशातील पोलीस फेरफटका मारीत हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.