शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील पाच हजार मराठा बांधवांची मुंबईत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:33 IST

 कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून मुंबईकडे कूच; सीमाभागातील लढ्याला पाठबळ

प्रदीप शिंदे कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चा ज्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये कर्नाटक सीमाप्रश्न सोडवावा, ही मागणी आहे. महाराष्ट्रातील या मराठा समाजाचा जर सीमालढ्यासाठी पाठिंबा मिळाला तर नक्कीच प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. या गोष्टींमुळे कर्नाटकातील सीमाभागातील लोकांमध्ये त्यामुळे एकप्रकारे चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळेच बेळगावात सकल मराठा समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. सुमारे दहा लाख नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आपली ताकद दाखवून दिली होती. आता मुंबईतील मोर्चातही आपली ताकद दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बेळगाव परिसरातील गावागावांत जनजागृती केली आहे. लहान-मोठ्या बैठका या भागात घेतल्या आहेत. सर्वजण बेळगाव येथील श्री रंगुबाई पॅलेस येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती प्रमुख कार्यालय येथून एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत मुंबईकडे मंगळवारी सायंकाळपर्यंत जात होते.

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबईतील मोर्चाबाबत जागृतीचे काम सुरू आहे. आता मराठा मूकमोर्चाच्या रूपातून पुन्हा सीमाभागातील नागरिकांना ताकद मिळाली आहे. महाराष्ट्रातील सरकार जरी आमच्या पाठीशी नसले तरी येथील सकल मराठा बांधवांनी आपल्या प्रमुख मागणीमध्ये बेळगाव सीमाप्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला ताकद मिळाली आहे.- दीपक दळवी,अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीगेली ६३ वर्षे सीमाप्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मराठा मूकमोर्चाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली जात आहे. त्यामुळे नक्कीच सीमाप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच बेळगांवसह आसपासच्या गावांतील हजारो मराठाबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत.- गुणवंत पाटील,प्रवक्ता, बेळगाव सकल मराठा समाज