शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एकाच कुटुंबात डेंग्यूचे पाच संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:03 IST

कोल्हापूर : मंगळवार पेठ, मंगेशकरनगर येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. याकडे महापालिकेच्या प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष ...

कोल्हापूर : मंगळवार पेठ, मंगेशकरनगर येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. याकडे महापालिकेच्या प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांमधून उमटत आहेत. आतापर्यंत शहरात डेंग्यूने पाचहून अधिक जणांचा बळी गेला आहे.महापालिका हद्दीत जूनमध्ये २९१ डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्यात आणखी वाढ होऊन ती संख्या ४६८ पर्यंत गेली. आॅगस्ट महिन्यात त्यात घट होऊन ती संशयित रुग्णांची संख्या ३१५, सप्टेंबरमध्ये १५८ झाली. ग्रामीण भागात सद्य:स्थितीत डेंग्यूचे ४७ रुग्ण अशी एकूण १३९ रुग्णसंख्या आहे.मंगेशकरनगरात एकाच कुटुंबातील दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. चार-पाच दिवसांपासून हे रुग्ण तापाने आजारी आहेत. त्यांतील चार रुग्ण हे घरी, तर एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.या परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. गटारींची स्वच्छता नाही, औषधांची फवारणी झाली नाही अथवा महापालिकेच्या कोणत्याही वैद्यकीय पथकाने तसेच नगरसेवकाने या भागाला भेट दिली नसल्याचे नागरिकांनी रविवारी सांगितले.शहरात प्रामुख्याने जून व जुलैमध्ये जवाहरनगर परिसरातील सासने-जमादार कॉलनी, सरनाईक वसाहतसह नेहरूनगर, कनाननगर या भागांत डेंग्यूची साथ होती. सध्या तेथील डेंग्यूची साथ कमी झाली आहे; पण डेंग्यूचा विळखा मंगेशकरनगर भागात अद्यापही असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.साडेदहा महिन्यांत डेंग्यूचे १३७८ रुग्णकोल्हापूर शहरात १ जानेवारी ते २७ आॅक्टोबर अखेर १३७८, तर ग्रामीण भागात ३९६ असे एकूण १७७४ डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.डेंंग्यूचे बळीतीन महिन्यांत कनाननगरातील शाळकरी मुलीचा, नेहरूनगर परिसरातील एकाचा तर दोन आठवड्यांपूर्वी पाटाकडील तालीम परिसरातील फुटबॉल खेळाडूचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे.