शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण ...

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास काळे व संबंधित महिलेची तोंड ओळख होती. रविवारी रात्री विकास, मंगेश आणि सोनू हे तिघे संबंधित महिलेच्या घरी गेले. महिलेकडे तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मागितला. महिलेने तो देण्यास नकार दिला. त्यावरुन वादावादी होऊन त्यांनी महिलेस व तिच्या मुलीस शिवीगाळ, धक्काबुक्कीही केली. दरम्यान, महिलेचे दोघे भाऊ घटनास्थळी आले, त्यांनाही त्यांनी शिवीगाळ करत दारात उभ्या केलेल्या दुचाकीची मोडतोड केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, दुसऱ्या महिलेने दिलेल्या विरोधी तक्रारीनुसार, भाच्याला सोडण्यासाठी गेले असता दोघांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून विनयभंग केला. या प्रकरणी राहुल कुरुंगळे, नागेश कुरुंगळे या दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.